नांदेड शहरातच सर्वाधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:37 AM2017-08-22T00:37:27+5:302017-08-22T00:37:27+5:30
जिल्ह्यातील १६ तालुक्यात असलेल्या मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस नांदेड शहरातच झाला असून वजिराबाद मंडळात आजपर्यंत तब्बल ८८५ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़ तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४४१़७६ मि़मी़पाऊस झाला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड:जिल्ह्यातील १६ तालुक्यात असलेल्या मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस नांदेड शहरातच झाला असून वजिराबाद मंडळात आजपर्यंत तब्बल ८८५ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़ तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४४१़७६ मि़मी़पाऊस झाला आहे़
मृग नक्षत्रानंतर सलग महिनाभर उघडीप दिली होती़ गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार बॅटींग करीत सर्वांनाच दिलासा दिला आहे़ जिल्ह्यात वार्षिक सरासरी ९५५़५५ मि़मी़ पाऊस पडतो़ यंदा दोनच दिवसात पावसाने द्विशतक पूर्ण केले आहे़
त्यात मंडळांचा विचार केल्यास नांदेड शहरातच सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे़ मंडळामध्ये नांदेड शहर-७८२ मि़मी, तुप्पा-५२९, विष्णूपुरी-७८२, वसरणी-६०३, वजिराबाद-८८५, नांदेड ग्रामीण-६३५, तरोडा-७१२, लिंबगांव-६८४, मुदखेड-६४४, मुगट-६४३, बारड-५४३, अर्धापूर-५४१, दाभड-५५३, मालेगांव-४२६, भोकर-५५९, किनी-५११, मोघाळी-४४४, मातूळ-३५१, उमरी-४५२, सिंधी-४३०, गोळेगांव-३६३, कंधार-४१०, कुरुळा-४०९, उस्माननगर-४४८, पेठवडज-३३०, फुलवळ-३३०, बारुळ-६०१, लोहा-४४९, माळाकोळी-३३१, कलंबर-४८९, सोनखेड-४१९, शिवडी-५१२, कापशी-५७१, किनवट-५६०, इस्लापूर-२६७, मांडवी-४७२, बोधडी-४८३, दहेली-३८४, जलधारा-४११, शिवणी-३५७, माहूर-३६६, वानोळा-४००, वाई-३५१, सिंदखेड-३१८, हदगांव-५०७, तामसा-४५६, मनाठा-४६२, पिंपरखेड-३९०, निवघा-५१८, तळणी-४३५, आष्टी-५४५, हिमायतनगर-३१८, सरसम-३६६, जवळगांव-३६३, देगलूर-३५६, खानापूर-२२८, शहापूर-३३६, मरखेल-१७२, हनेगांव-२१३, मालेगांव-२२१, बिलोली-४६१, आदमपूर-३६५, लोहगांव-३९९, सगरोळी-३६३, कुंडलवाडी-४१२, धर्माबाद-५५४, जारीकोट-३५९, करखेली-३५७, नायगांव-४९५, नरसी-२९२, मांजरम-२८२, बरबडा-४७७, कुंटूर-४९२, मुखेड-३९६, जांब बु़-४५२, येवती-४७५, जाहूर-३३२, चांडोळा-३३९, मुक्रमाबाद-४८७ तर बाºहाळी मंडळात आजपर्यंत ३१५ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़