किडणी देत मातेने दिला मुलाला पुनर्जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:03 AM2021-07-04T04:03:26+5:302021-07-04T04:03:26+5:30

कोरोना महामारी व निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी कुटुंबाची अवस्था अतिशय बिकट झालेली. त्यातच राजू पुंजाजी पाडसवान (३३, रा. पिंपरखेडा, कन्नड) ...

The mother gave birth to a child by giving a kidney | किडणी देत मातेने दिला मुलाला पुनर्जन्म

किडणी देत मातेने दिला मुलाला पुनर्जन्म

googlenewsNext

कोरोना महामारी व निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी कुटुंबाची अवस्था अतिशय बिकट झालेली. त्यातच राजू पुंजाजी पाडसवान (३३, रा. पिंपरखेडा, कन्नड) याच्या दोन्ही किडणी निकामी झाल्या. तो डिसेंबरपासून डायलिसीसवर जीवन जगत होता. किडणीचा शोध घेतला, परंतु किडणी काही मिळत नव्हती. मुलाची अशी अवस्था मातेला पाहवत नव्हती. म्हणून आई यमुनाबाई (५३) यांनी स्वत:ची किडणी मुलाला देण्याचा व त्याचा जीव वाचविण्याची निर्णय घेतला. तिची किडणी जुळली आणि मुलावर शुक्रवारी औरंगाबाद शहरातील खासगी दवाखाना (सिग्मा) येथे यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

लॉकडाऊन काळात आर्थिक संकटाने लॉक झालेल्या कुटुंबाला बाहेर दुसऱ्याला पैेसे देणे शक्य नव्हते. जेमतेम खर्चात शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने अखेर ‘आईने दाखविलेल्या हिमतीने कुटुंबाच्या जिवात जीव आला. गेली सहा महिने राजू डायलिसीसवर जगत होता. मातेने स्वत:ची किडणी देऊन त्याच्या पंखात बळ भरले आहे. मातेच्या या त्यागामुळे मुलाला पुनर्जन्म मिळाल्याने समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

(फोटो)

Web Title: The mother gave birth to a child by giving a kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.