मुलगी, जावयाच्या मदतीने सासूचे सेक्स रॅकेट; डमी ग्राहकाने 'हाय' मेसेज पाठवताच पोलिसांचा छापा

By सुमित डोळे | Published: February 20, 2024 01:11 PM2024-02-20T13:11:05+5:302024-02-20T13:11:23+5:30

गेल्या महिन्याभरात छत्रपती संभाजीनगरात सेक्स रॅकेटवरील ही सातवी कारवाई आहे.

Mother-in-law's sex racket with help from daughter, son-in-law; As soon as the dummy customer sends the 'Hi' message, the police raid | मुलगी, जावयाच्या मदतीने सासूचे सेक्स रॅकेट; डमी ग्राहकाने 'हाय' मेसेज पाठवताच पोलिसांचा छापा

मुलगी, जावयाच्या मदतीने सासूचे सेक्स रॅकेट; डमी ग्राहकाने 'हाय' मेसेज पाठवताच पोलिसांचा छापा

छत्रपती संभाजीनगर : उच्चभ्रू वसाहतीत भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन माधुरी सुरेश थोरात (४२, रा. विटखेडा) हिने मुलगी व जावयाच्या मदतीने सातारा, नक्षत्रवाडीत राजरोस सेक्स रॅकेट सुरू केले. अहमदनगर, नाशिकच्या मुलींना घरी आणून माधुरी हा देहविक्रीचा धंदा करत होती. उपायुक्तांच्या पथकाने रविवारी रात्री डमी ग्राहक पाठवून दोन घरांमध्ये छापा टाकत माधुरीसह जावई शरद संजय साबळे (२९) व रोहिणी शरद साबळे (२१) यांना रंगेहात पकडले. त्यांच्या तावडीतून ५ पीडितांची सुटका करण्यात आली. गेल्या महिन्याभरात शहरात सेक्स रॅकेटवरील ही सातवी कारवाई आहे.

उपायुक्त नवनीत काँवत यांना या रॅकेटविषयी माहिती प्राप्त झाली होती. त्यांनी सहायक पोलिस आयुक्त डॉ. रणजित पाटील यांना कारवाईच्या सूचना केल्या. पाटील, उपनिरीक्षक विनोद आबुज यांनी रविवारी रात्री बीड बायपासवर सापळा रचला. डमी ग्राहक व शरदमध्ये पैशांचा व्यवहार ठरल्यानंतर देहविक्रीची खात्री झाली. पोलिसांनी साताऱ्यातील गोपालनगरमध्ये सी. आर. रेसिडेन्सीच्या फ्लॅट क्रमांक ३ मध्ये मध्ये छापा टाकला. तेव्हा शरदसह त्याची पत्नी रोहिणी उपस्थित होती. तेथील पीडितेच्या चौकशीत शरदची सासू माधुरीच्या घरी आणखी मुली असल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी माधुरीचे घर गाठले असता तेथे चार पीडिता होत्या. माधुरीने देखील ग्राहकांच्या मागणीनुसार देहविक्रीसाठी मुली पुरवत असल्याची कबुली दिली. पीडितांची सुधारगृहात रवानगी करून तिघांना अटक करण्यात आली. निरीक्षक ब्रम्हा गिरी, सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले, आबुज, सुरेश जारवाल, अंमलदार शोन पवार, संदीप क्षीरसागर, श्रीकांत काळे, योगेश गुप्ता, सागर पांढरे, दीपक शिंदे, सुनील गुमलाडू यांनी कारवाई पार पाडली.

'हाय' मेसेजचा अलर्ट
शरदने पोलिसांच्या डमी ग्राहकाला व्हॉट्सॲपवर पाच मुलींचे छायाचित्र पाठवले. ३ हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. शरद ग्राहकाला अपार्टमेंटपर्यंत गाडी आणू देत नाही. तो डमी ग्राहकाला बीड बायपासवरुन त्याच्या दुचाकीवर घेऊन गेला. पैशांचा व्यवहार होताच त्याने फ्लॅटमधून पोलिसांना 'हाय'चा मेसेज पाठवण्याचा इशारा ठरला होता. डमी ग्राहकाकडून मेसेज प्राप्त होताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी फ्लॅट गाठला. ३ हजारांपैकी ५०० पीडितेला तर अडीच हजार तिघे ठेवत हाेते.

तो म्हणतो मित्र, सासू म्हणते भाची
पोलिसांना पाहताच शरदने उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले. पोलिसांनीच पाठवलेल्या डमी ग्राहकाला मित्र तर पीडिता त्याची पत्नी असल्याचे सांगितले. माधुरीच्या घरात पोलिस पोहोचल्यानंतर चारही पीडिता बहिणीच्या मुली आहेत. माझी तब्येत बरी नसल्याने आल्याचे सांगत नाटक केले. सर्व मुली या २५ ते ३० वयोगटातील होत्या.

Web Title: Mother-in-law's sex racket with help from daughter, son-in-law; As soon as the dummy customer sends the 'Hi' message, the police raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.