मातेनेच केली चिमुरड्याची हत्या; दुसरा मुलगा नको म्हणून पिंपात बुडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:34 AM2018-06-26T04:34:04+5:302018-06-26T04:34:08+5:30

क्रूर आईला अटक

Mother killed Kidnapped girl; The second boy did not dip as he did | मातेनेच केली चिमुरड्याची हत्या; दुसरा मुलगा नको म्हणून पिंपात बुडवले

मातेनेच केली चिमुरड्याची हत्या; दुसरा मुलगा नको म्हणून पिंपात बुडवले

googlenewsNext

चितेगाव (जि. औरंगाबाद) : दहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या मातेनेच त्याची पाण्याच्या पिंपामध्ये बुडवून हत्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी क्रूरकर्म्या महिलेला अटक केली आहे. हा मुलगा आवडत नसल्याने त्याला संपविल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. देविका परमेश्वर एरंडे, असे आरोपी महिलेचे, तर प्रेम मृत चिमुकल्याचे नाव आहे.
शनिवारी मध्यरात्री देविकाने बिडकीन पोलिसांना फोन करून तिचा दहा महिन्यांचा मुलगा घरातून हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा श्वान घर आणि अंगणातच घुटमळले. तसेच तक्रारदार मातेच्या चेहºयावर बाळ हरवल्याचे दु:ख दिसत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला होता.
पोलिसांना झडतीत घराच्या अंगणात झाकलेल्या पाण्याच्या पिंपामध्ये चिमुकल्या प्रेमचा मृतदेह आढळला. त्यानंतर देविकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तपासात तिने हत्येची कबुली दिली.

मुलीसाठी मुलाचा केला खून
पहिल्या मुलानंतर दुसरी मुलगी व्हावी, असे तिला वाटायचे; मात्र दुसरे अपत्यही मुलगाच झाल्याने तिला प्रेम आवडत नव्हता. दोन्ही मुलांचा सांभाळ करणे शक्य नसल्याने देविकाने त्याला पिंपात बुडवले.
आधीही हत्येचा प्रयत्न?
आठ दिवसांपूर्वी देविका प्रेमसोबत घरी असतानाही तो पाण्याच्या टबमध्ये पडला होता. त्यानंतर त्याला औरंगाबादेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नामुळे त्याचे प्राण वाचले होते. हासुद्धा प्रेमच्या हत्येचा प्रयत्न असल्याचा पोलिसांना संशय होता. तो धागा पकडून पोलिसांनी तिला बोलते केले.

Web Title: Mother killed Kidnapped girl; The second boy did not dip as he did

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.