आई मृत्यू पावल्याचे सांगितले
By | Published: December 2, 2020 04:05 AM2020-12-02T04:05:28+5:302020-12-02T04:05:28+5:30
सदर मयत महिला ही सिल्लोडमध्ये एकटीच राहत होती. चौकशी, माहितीवरून एका कुटुंबातील सदस्यांना विचारपूस केली, तेव्हा या कुटुंबातील मुलांनी ...
सदर मयत महिला ही सिल्लोडमध्ये एकटीच राहत होती. चौकशी, माहितीवरून एका कुटुंबातील सदस्यांना विचारपूस केली, तेव्हा या कुटुंबातील मुलांनी सदर महिला ही आपली आई नाही, आपली आई अडीच वर्षांपूर्वीच वारल्याचे सांगितले. इतर कोणी नातेवाईकही सापडले नाहीत. नातेवाईक शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; परंतु कोणीही मिळाले नाही. त्यामुळे अंत्यविधी करण्यात आला.
-आर. के. वर्पे, पोलीस हेडकान्स्टेबल, सिल्लोड
...यामुळे करावे लागते दफन
अशा मृत्यूच्या घटनांनंतर अनेकदा कायदेशीर बाबी, वाद उद्भवण्याची शक्यता असते. नातेवाईक समोर येऊन मृत्यूविषयी आरोप- प्रत्यारोप होतात. त्यामुळे मृतदेह दफन करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.