माता न तू वैरीणी ! पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची आईनेच दिली सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 03:56 PM2021-11-25T15:56:00+5:302021-11-25T15:58:36+5:30

Rape On Minor Girl In front Of Mother : याप्रकरणी पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आईसह आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mother, you are the enemy! The mother gave a permission to rape on her minor girl | माता न तू वैरीणी ! पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची आईनेच दिली सूट

माता न तू वैरीणी ! पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची आईनेच दिली सूट

googlenewsNext

औरंगाबाद: पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची खुली सुट देऊन हा बीभत्सपणा उघड्या डोळ्याने पाहणारी आई आणि परितक्त्या आईशी अनैतिक संबंध ठेवताना मुलीवरही आघात करणारा आरोपी अशा दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली (The mother gave a permission to rape on her minor girl) . पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, सोहम गाडे (गाडेकर) ( ४५, रा. पुंडलिकनगर) व त्याच्यासोबत अनैतिक संबंध असलेली महिला (३६) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या महिलेच्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

पतीशी पटत नसल्याने सदर विवाहिता अल्पवयीन मुलगी व मुलासह गारखेडा परिसरात भाड्याच्या खोलीत राहते. १७ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अंदाजे सहा वर्षांपासून सोहम गाडे आईला भेटण्यास नेहमी घरी येतो. अनेकदा रात्रीच्या वेळीदेखील तो आमच्या घरीच थांबतो. ऑगस्ट २०२० मध्ये आईने माझ्या भावाला मामाकडे पाठवून दिले. त्यादिवशी रात्रीच्या वेळी सोहम गाडे हा आमच्या घरी आला. त्याचे व आईचे काही तरी बोलणे झाले. त्यानंतर सोहम गाडे माझ्याजवळ आला व बळजबरी करू लागला. मी आईकडे तक्रार केली तेव्हा आईनेच त्याला संमती दिली. माझा विरोध कमी पडला व त्याने माझ्यासोबत जबरदस्ती केली. तेव्हा आईही तेथेच होती. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दोनदा त्याने असेच केले. आई व सोहम यांच्या त्रासाला वैतागून मी घरातून निघून गेले; पण आसरा न मिळाल्याने पुन्हा घरी आले.

जीवे मारण्याची धमकी
याबाबत कोणालाही काही सांगितले, तर मारुन टाकण्याची धमकी आई व सोहम गाडे यांनी दिल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. मामाच्या घरी पाठवून लग्न लावून देण्याची हालचाल पाहून मुलीने चाईल्ड हेल्पलाइनला संपर्क केला व त्यानंतर चक्रे हालली. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवा गायकवाड यांनी दोघांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Mother, you are the enemy! The mother gave a permission to rape on her minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.