प्रसुतीनंतर मातेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:36 AM2017-09-15T00:36:26+5:302017-09-15T00:36:26+5:30
एका गोंडस चिमुकलीला जन्मही दिला. दुदैवाने अतिरक्तस्राव झाल्याने मातेचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कळा येऊ लागल्याने मातेला खाजगी रुग्णालयात दाखल केले. एका गोंडस चिमुकलीला जन्मही दिला. दुदैवाने अतिरक्तस्राव झाल्याने मातेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी बीडमध्ये घडली.
सविता विजय कुलकर्णी [वय ३५, रा. नाथ सृष्टी, अंकुशनगर, बीड] असे प्रसुतीनंतर मृत्यू पावलेल्या मातेचे नाव आहे. सविता कुलकर्णी या झापेवाडी येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. दिव्यांग असणाºया सविता कुलकर्णी यांना कळा येऊ लागल्याने बुधवारी बीड शहरातीलच बसस्थानकासमोरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांची नैसर्गिक प्रसुती झाली. यामध्ये त्यांनी एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला. परंतु या चिमुकलीचे अवघ्या काही तासातच मायेचे छत्र हरवले. अतिरक्तस्राव झाल्यामुळे सविता कुलकर्णी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, ुमुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे. त्यांचेही पतीही दिव्यांग असून, बीड नगर पालिकेत कार्यरत आहेत.