एक महिन्याच्या बालिकेस नालीत ठेवून माता पसार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:07 AM2017-08-18T00:07:58+5:302017-08-18T00:07:58+5:30

शहरातील अतिशय गजबजलेल्या लोहिया मैदान या बाजारपेठेच्या भागातील एक महिन्याच्या बालिकसे नालीत ठेवून निर्दयी माता पसार झाल्याची ठटना १७ आॅगस्ट रोजी दुपारी २ च्या दरम्यान उघडकीस आली. दरम्यान, आई- वडिलांनी पोलिस ठाणे गाठून मुलीला ताब्यात घेतल्याने या प्रकरणावर सायंकाळी उशिरा पडदा पडला

Mothers leave a month after leaving the baby! | एक महिन्याच्या बालिकेस नालीत ठेवून माता पसार..!

एक महिन्याच्या बालिकेस नालीत ठेवून माता पसार..!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
देगलूर : शहरातील अतिशय गजबजलेल्या लोहिया मैदान या बाजारपेठेच्या भागातील एक महिन्याच्या बालिकसे नालीत ठेवून निर्दयी माता पसार झाल्याची ठटना १७ आॅगस्ट रोजी दुपारी २ च्या दरम्यान उघडकीस आली. दरम्यान, आई- वडिलांनी पोलिस ठाणे गाठून मुलीला ताब्यात घेतल्याने या प्रकरणावर सायंकाळी उशिरा पडदा पडला.
देगलूर शहराच्या विविध वसाहतीचे सांडपाणी लोहिया मैदान परिसरातील मोठ्या नाल्यातून नदीपात्रात जाते. पाण्याचा मोठ्या प्रवाहात मुलगी वाहून जाईल, या हेतूने येथे सोडून जाण्याचे कृत्य केले असावे असे दिसते. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लहान मुलाच्या सततच्या रडण्याच्या आवाज ऐकून तेथील दुकानदार सतर्क झाले व त्यांनी शोध घेतला असता नालीमध्ये स्त्री जातीचे मूल असल्याचे आढळून आले. ते मूल बाहेर काढून काही महिलांच्या मदतीने आंघोळ व कपडे घालून रुपेश काशेटवार, राजेश आऊलवार, दिगंबर कौरवार, माधव पाटील पाळेकर, बजरंग दासरवार, भीमराव बोरगावकर, गजानन गोपछेडे यांनी पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांच्या सूचनेनुसार या मुलीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी बेंदीगुडे व परिचारिका सुभद्रा पडलवार, सुकेशिनी ढवळे, वर्षा मगडेवार यांनी उपचार केले. ही बालिका बºयाच वेळेपासून भुकेली असल्याने तिला कोणते दूध पाजवावे? या विवंचनेत वैद्यकीय कर्मचारी वर्ग असताना प्रकरणाच्या कार्यवाहीसाठी आलेल्या महिला कॉन्स्टेबल सावित्री हणमंते यांचे मातृत्व जागे होवून त्यांनी आपल्या अंगावरील दूध पाजताच मूल शांत झाले. ही घटना ज्या ठिकाणी झाली तेथील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेºयात मूल नालीत ठेवतानाचे दृश्य कैद झाले. मुलीस नांदेडच्या शिशुगृहात हलवित असताना सायंकाळी ६ च्या दरम्यान नगरसेवक अ‍ॅड. अंकुश देसाई यांना सोबत घेवून मारोती कोंडेकर व मावशी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. कोंडेकर यांनी ही मुलगी माझी आहे, असे सांगून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्यातही जावून त्यांनी मुली माझीच आहे, असे सांगितले.

Web Title: Mothers leave a month after leaving the baby!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.