मद्यपानापासून दूर राहण्यासाठी चारशेवर लोकांना केले प्रेरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 06:43 PM2018-11-18T18:43:02+5:302018-11-18T18:43:35+5:30
औरंगाबाद : अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमस परिवर्तन समूह आणि अॅल अॅनान परिवर्तन समूहाचा वर्धापन दिन रविवारी साजरा करण्यात आला आहे. या समूहातर्फे गेल्या वर्षभरात चारशेवर लोकांना मद्यपानापासून दूर राहण्यासाठी प्रेरित केल्याची माहिती पत्रकार परिषदेत रमेश बी. यांनी दिली.
अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमस : वर्धापन दिनानिमत्त अल्कोथॉन विशेष सभा
औरंगाबाद : अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमस परिवर्तन समूह आणि अॅल अॅनान परिवर्तन समूहाचा वर्धापन दिन रविवारी साजरा करण्यात आला आहे. या समूहातर्फे गेल्या वर्षभरात चारशेवर लोकांना मद्यपानापासून दूर राहण्यासाठी प्रेरित केल्याची माहिती पत्रकार परिषदेत रमेश बी. यांनी दिली.
पहिल्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात अल्कोथॉन या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुमारे १५० जणांची उपस्थिती होती. यावेळी मद्यपान हा एक जीवघेणा आजार आहे. या व्यसानामुळे कौटुंबिक अवस्था बिघडते, यासह विविध मुद्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमस परिवर्तन समूह ही मद्यपीडितांसाठी, तर अॅल अॅनान परिवर्तन समूह मद्यपीडितांच्या कुटुंबांसाठी काम करते.
या दोन्हीचे एकूण सहाशेवर सभासद आहेत, अशी माहिती रमेश बी. आणि सुधीर बी. यांनी दिली. मद्यपाश हा भयंकर आजार आहे, जो अनेक विकारांना कारणीभूत ठरतो. मद्यामुळे स्नायूंना इजा, मेंदूची अकार्यक्षमता, फुफ्फुसांना इजा (क्षयरोग), हृदयरोग, जठराला इजा, यकृताला इजा आदी समस्यांना तोंड द्यावे लागते. दारू पिणाऱ्या व्यक्तीबरोबर त्याच्या कुटुंबियालाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मद्यपींच्या मद्यमुक्तीसाठी अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमस मोफत सेवा देत असल्याचीही माहिती देण्यात आली.