नारेगाव कचरा डेपोविरोधात १६ पासून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:06 AM2018-02-09T00:06:33+5:302018-02-09T00:06:40+5:30
मांडकी शिवारातील नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यासाठी मनपाला चार महिन्यांची देण्यात आलेली मुदत १६ फेबु्रवारी रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी बुधवारी बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. उद्या शुक्रवारी मनपा, पोलीस आणि विभागीय आयुक्त यांना कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थ निवेदन देणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मांडकी शिवारातील नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यासाठी मनपाला चार महिन्यांची देण्यात आलेली मुदत १६ फेबु्रवारी रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी बुधवारी बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. उद्या शुक्रवारी मनपा, पोलीस आणि विभागीय आयुक्त यांना कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थ निवेदन देणार आहेत.
१६ फेब्रुवारीपासून एकही कचरा गाडी डेपोत जाऊ दिली जाणार नाही. यासाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आंदोलनाच्या इशाºयामुळे शहरातील कचºयाचा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. कचरा डेपो हटविण्यासाठी गोपाळपूर, मांडकी, महालपिंपरी, पिसादेवी, वरूड, पोखरी, कच्चीघाटी, रामपूर या गावांतील ग्रामस्थांची आंदोलन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली. आंदोलन छेडण्यापूर्वी प्रशासनाला आठ दिवस अगोदर नोटीस बजावण्याच्या दृष्टीने उद्या ९ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाºयांसह मनपा, पोलीस आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येईल.
कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थांनी दिवाळीच्या तोंडावर तीन दिवस आंदोलन करून कचरा वाहतुकीची वाहने रोखली होती. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर मनपाने
चार महिन्यांत कचरा डेपो हटविण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. चार महिन्यांच्या काळात मनपाकडून कचºयाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले. मात्र, प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला नाही.
कचरा डेपोवर रासायनिक प्रक्रिया
मनपाकडून कचºयाच्या ढिगाºयावर रसायनाच्या साह्याने मायनिंगची प्रक्रिया केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या दोन पोकलेनद्वारे सपाटीकरण करण्याच्या कामाला गुरुवारी सुरुवात केल्याचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले.
मांडकी शिवारातील कचरा डेपो हटविण्यासाठी चार महिन्यांची देण्यात आलेली मुदत येत्या १६ फेबु्रवारी रोजी संपत आहे. या डेपोत सुमारे ४० हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे.
त्या कचरा डेपोमुळे परिसरातील १५ गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, शेतीवरही त्याचा परिणाम होत असल्यामुळे ग्रामस्थांनी कचरा डेपो हटविण्याची मागणी लावून धरली आहे.