नांमकातून आवर्तनाला उशीर झाल्याने औरंगाबादेत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:11 AM2018-04-14T00:11:27+5:302018-04-14T00:12:54+5:30
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंपदा विभागासमोर पाण्यासाठी सामूहिक आत्मदहनाचा इशारा देऊन ठिय्या मांडल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंपदा विभागासमोर पाण्यासाठी सामूहिक आत्मदहनाचा इशारा देऊन ठिय्या मांडल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान कालव्यात २.५८ टीएमसी पाणी शिल्लक असून, त्यापैकी पाण्याचे आवर्तन उशिराने सुरू करण्यात आले आहे. उपलब्ध पाण्यापैकी १.२८ टीएमसी पाणी सोडण्याचे जाहीर केल्याने आंदोलकांनी माघार घेतली.
गंगापूर- वैजापूर तालुक्यातील नांमकाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांंनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली तसेच मंत्रालयातही आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी विषय मांडला तेव्हा तुम्ही पाण्यासाठी कोर्टात जाऊन दाद मागावी, अशी उत्तरे देण्यात आल्याने शेतकºयांनी १३ एप्रिल रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. पाणी व्यवस्थापन जनजागृती कृती समिती लाभधारक अन्यायग्रस्त शेतकºयांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर ठिय्या मांडून प्रचंड घोषणाबाजी सुरू केली.
वैजापूर- गंगापूर तालुक्याला वरदान ठरलेल्या नांदूर-मधमेश्वर कालव्याचे पाणी महिनाभरापासून आले नसल्याने संतप्त शेतकरी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळावर धडकले. यावेळी आ. सुभाष झांबड, आ. भाऊसाहेब पा. चिकटगावकर, आ.प्रशांत बंब यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करून शेतकºयांसह एक शिष्टमंडळ कार्यकारी संचालक आ. प्र. कोहिटकर यांना भेटले. यावेळी शेतकºयांच्या मागण्या मांडल्या. त्यावेळी त्यांनी कालव्यातील पाण्याची सध्याच्या स्थितीची कल्पना दिली आणि पाणी गुरुवारपासून सोडण्यात आले आहे. मात्र, कालव्यातून येणारे पाणी एक महिना उशिराने का सोडले आणि ते किती टीएमसी सोडणार इत्यादी विषयावर चर्चा झाली. २.५८ टीएमसी पाण्यातून अखेर १.२८ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवर्तन झाले असून, पुन्हा उर्वरित मागण्यांविषयी २१ एप्रिल रोजी पुन्हा चर्चा करण्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी संतोष जाधव, भाऊसाहेब बारहाते, शिंदे तसेच गंगापूर- वैजापूर तालुक्यातील पाणी व्यवस्थापन जनजागृती कृती समिती लाभधारक अन्यायग्रस्त शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पाण्याचे आणले जार...
पाणी व्यवस्थापन जनजागृती कृती समिती लाभधारक अन्यायग्रस्त शेतकºयांनी पाण्यासाठी आंदोलन केले अन् पोलीस व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग प्रशासनाचा गोंधळ उडाला. उन्हाचा पारा वाढलेला असताना संतप्त आंदोलकांना पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी तुम्ही आंदोलन करा; परंतु तुम्ही पाणी प्या मी पण शेतकºयांचाच मुलगा आहे, असे म्हणून पाण्याचे जार आणून ठेवले. त्यावर आंदोलकांनीही थोडा संयम ठेवला.