सोयगावात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन
By | Published: December 9, 2020 04:03 AM2020-12-09T04:03:36+5:302020-12-09T04:03:36+5:30
सोयगाव : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात आणलेले कायदे रद्द करावेत यासाठी भारत बंद पुकारण्यात आला होता. याला शिवसेनेच्या वतीने ...
सोयगाव : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात आणलेले कायदे रद्द करावेत यासाठी भारत बंद पुकारण्यात आला होता. याला शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सोयगावात केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्तार म्हणाले की, केंद्र सरकारने हे कायदे रद्द केले नाहीत, तर शेतकरी या सरकारला त्यांची जागा दाखवून देतील. दिल्लीत शेतकरी आपल्या न्याय्य व हक्कासाठी संयमाने आंदोलन करीत होते. मात्र, या सरकारने कडाक्याच्या थंडीत आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारून हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न केले. इंग्रजांनीही अशा प्रकारचा छळ देशातील शेतकऱ्यांचा केला नाही असा आरोप त्यांनी केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, प्रभाकरराव काळे, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, डॉ. अस्मिता पाटील, संतोष बोडखे, तालुका संघटक दिलीप मचे, तालुका उपप्रमुख गुलाबराव कोलते यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
फोटो - आंदोलनात मार्गदर्शन करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.