भाजप महिला मोर्चातर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:05 AM2021-09-18T04:05:17+5:302021-09-18T04:05:17+5:30
मनपा मुख्यालयात ध्वजारोहण औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सकाळी ७ वाजता प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते ...
मनपा मुख्यालयात ध्वजारोहण
औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सकाळी ७ वाजता प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. प्रशासकांनी सर्वांना मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, रवींद्र निकम, मुख्य लेखापरीक्षक दे. का. हिवाळे, शहर अभियंता एस. डी. पानझडे, सहाय्यक संचालक नगररचना विभाग जयंत खरवडकर, उपायुक्त संतोष टेंगळे, अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता डी. बी. फड, अविनाश देशमुख, पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे आदींची उपस्थिती होती.
सहा हजार घरांमध्ये औषध फवारणी
औरंगाबाद : डेंग्यू आजाराला आळा घालण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली असून, तिसऱ्या दिवशी शुक्रवारी झोन क्रमांक ३ मध्ये ६ हजार ६७ घरांमध्ये औषध फवारणी करण्यात आली. १२ हजार २७० कंटेनर तपासण्यात आले. त्यातील ४५ कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या. ८ हजार ८५७ कंटेनरमध्ये ॲबेट ट्रीटमेंट केले. १९५४ घरांमध्ये औषध फवारणी, ९० घरांमध्ये धूरफवारणी केली. डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.