बीएसएनएल कर्मचारी संघटनेचे आंदोलन

By Admin | Published: July 14, 2017 12:18 AM2017-07-14T00:18:59+5:302017-07-14T00:23:22+5:30

नांदेड : बीएसएनएल कर्मचारी संघटनेच्यावतीने बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.

Movement of BSNL Employee Association | बीएसएनएल कर्मचारी संघटनेचे आंदोलन

बीएसएनएल कर्मचारी संघटनेचे आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : वेतन करार निश्चित करणे, सेवा सुरक्षा नियम लागू करणे, सेवानिवृत्तांच्या वेतनाचे पुनर्रनिर्धारण करणे तसेच संप, बैठका तसेच अन्य आंदोलनावर टाकलेले निर्बंध मागे घ्यावे, या प्रमुख मागण्यासाठी बीएसएनएल कर्मचारी संघटनेच्यावतीने बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.
नांदेड येथे टेलिफोन भवन समोर हे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण देशभर बीएसएनएल कर्मचारी संघटनेच्यावतीने बुधवारी लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.
त्यात उपरोक्त मागण्या करण्यात आल्या. सरकारने एका परिपत्रकान्वये कर्मचाऱ्यांचा संप, बैठक व अन्य आंदोलनाचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी करणारे हे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात बीएसएनएल कर्मचारी संघटनेचे प्रदेश संघटन सचिव प्रकाश जैन, देविदास फुलारी, लालू कोंडलवाडे, श्याम जाधव, बंडोपंत कुंटूरकर, राजीव वानखेडे, श्याम क्षीरसागर, डी.एल. चौरे, दिलीप बळवंतकर, बी.आर. कांबळे, ए.डी. कु लकर्णी, ए.व्ही. राखोंडे, खलिद मसूद, राजमणी गोरे आदींची उपस्थिती होती. हे आंदोलन बघण्यासाठी जाणाऱ्या- येणाऱ्यांची गर्दी जमली होती.

Web Title: Movement of BSNL Employee Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.