सोयाबीन अनुदानासाठी जिल्हास्तरावर हालचाली
By Admin | Published: July 5, 2017 11:36 PM2017-07-05T23:36:05+5:302017-07-05T23:39:12+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे एकूण १७ हजार ५११ शेतकऱ्यांचे सोयाबीन अनुदानासाठी प्रस्ताव दाखल झालेले प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे एकूण १७ हजार ५११ शेतकऱ्यांचे सोयाबीन अनुदानासाठी प्रस्ताव दाखल झालेले प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकाने तपासणी करुन पुणे येथील पणन महामंडळाकडे शिफारशीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील एकूण सहा बाजार समित्या आहेत. यामध्ये २ लाख ८३ हजार ५६१.७६ क्विंटल सोयाबीनचे २०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे अनुदान घेण्यासाठी १७ हजार ५११ शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाले आहेत. यामध्ये आ. बाळापूर बाजार समितीतून ९४१.९६ क्विंटल सोयाबीनसाठी ५८ शेतकरी, सेनगाव ५०३७ क्विं. साठी २५०५, हिंगोली १ लाख १० हजार ९५७ क्विं. साठी ७९२०, वसमत १लाख ९ हजार ९६ क्विंटलसाठी ६२०२, जवळा बाजार ११ हजार ५९० क्विं. ५५६ शेतकरी, तर कळमनुरी बाजार समितीकडून ५ हजार ८३० क्विंटलसाठी २७० शेतकऱ्यांचे प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडून जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाले आहेत. शक्यतोवर बाजार समितीकडून आलेले कोणतेच प्रस्ताव त्रुटीत काढण्यात आलेले नाहीत. असे एकूण २ लाख ८५ हजार ५६१. ७६ क्विंटल सोयाबीनसाठी १७ हजार ५११ शेतकऱ्यांच्या प्रस्तावाची तपासणी करुन पुणे येथील पणन महामंडळाकडे शिफारशीसाठी पाठविण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात सोयाबीनचे अनुदान मिळण्यास मदत होणार आहे.