२ जूनपासून डॉक्टरांचे आंदोलन

By Admin | Published: June 1, 2014 12:13 AM2014-06-01T00:13:54+5:302014-06-01T00:28:17+5:30

जालना : वैद्यकीय अधिकार्‍यांच्या प्रंलबित मागण्या पूर्ण न केल्यास येत्या २ जूनपासून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

The movement of doctors from June 2 | २ जूनपासून डॉक्टरांचे आंदोलन

२ जूनपासून डॉक्टरांचे आंदोलन

googlenewsNext

 जालना : शासनाने राज्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या प्रंलबित मागण्या पूर्ण न केल्यास येत्या २ जूनपासून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. सन २०११ मध्ये महाबळेश्वर पाचगणी येथे झालेल्या संघटनेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव यांच्यासमोर आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन संघटनेला देण्यात आले होते; परंतु आतापर्यंत अनेक मागण्या पूर्ण न झाल्याने आम्ही आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ.ए.बी जगताप यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अधिकार्‍यांना पूर्वलक्ष लाभ मिळणे, तसेच अस्थाई असलेल्या ७८९ बी.एस.एम.एस वैद्यकीय अधिकारी, आणि ३२ बी.डी.एस वैद्यकीय अधिकारी यांचे सन २००९ ते १० वर्षात समावेशन करण्यात यावे, तसेच २००६ पासून राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू करणे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांस वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे उच्च वेतन मिळणे, खातेअंतर्गत पदोन्नतीचे प्रश्न मार्गी लावणे, सेवाज्येष्ठता यादी तात्काळ तयार करणे, वैद्यकीय अधिकार्‍यांचे कामाचे तास केंद्र शासन तसेच इतर राज्याप्रमाणे ठरविणे अशा अनेक प्रंलबित मागण्या जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या आंदोलनात सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन झंवर व्ही.ए , एस.झेड. रोडे, पी.एस. गवारे, योगेश सोळंके, पी.एस. सानटक्के, आर.बी.अग्रवाल आर.एस. मोहिते, ए.एल.जाधव यांनी केले आहे.

Web Title: The movement of doctors from June 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.