आंदोलन, उपोषणाने गाजला मंगळवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2016 12:10 AM2016-05-11T00:10:28+5:302016-05-11T00:13:12+5:30

बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सकाळपासून विविध संघटनांच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणे करण्यात आली,

Movement, fasting Tuesday | आंदोलन, उपोषणाने गाजला मंगळवार

आंदोलन, उपोषणाने गाजला मंगळवार

googlenewsNext

बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सकाळपासून विविध संघटनांच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणे करण्यात आली, तर अनेक वर्षांपासून वेतन रखडल्याने शिक्षकांनीही ठिय्या मांडला होता. घोषणाबाजी व निदर्शनांमुळे कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
कर्जमाफीची मागणी
परवानाधारक सावकारांकडून कर्जमाफी आलेली असतानादेखील रक्कम मिळत नसल्याने धारूर तालुक्यातील गावंदरा येथील मधुकर मारुती घुले या शेतकऱ्याने उपोषण केले सुरू केले आहे. कर्जरकमेतील ९५ हजार ४५१ रुपये शासनाने परवानाधारक सावकारांना दिलेले असतानाही केवळ ५५ हजार रुपयांची रक्कम माफ झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करून न्याय देण्याची मागणी घुले यांनी केली आहे.
शिक्षकाचे वेतन रखडले
परळी येथील वीरभद्रेश्वर प्राथमिक विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जगन्नाथ भगवंतराव वाकडे यांचे थकीत वेतन, बिलातील फरक, वेतनवाढ, वेतनभत्ते, तसेच २००६ पासूनचा कायम मान्यतेबाबतचा निर्णय रखडल्याने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य करून न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंबंधी शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय यांनाही निवेदन दिले आहे.
शेतमजूर युनियन
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करून मजुरांना ३०० रुपये रोजगार द्यावा, धारुर नगर पंचायतीमधील बंद असलेली कामे सुरू करावीत, अंबाजोगाई तालुक्यातील टाकरवण, मोहा, पाटोदा येथील मजुरांचे थकित वेतन त्वरित अदा करावे, अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित असलेल्या शेतमजुरांचा यादीत समावेश करावा, तसेच वृद्ध निराधारांच्या निवृत्ती वेतनातील ४०० रुपये फरकाची रक्कम त्वरित वाटप करावी, या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्या दुर्लक्षामुळेच रोहयोची कामे रखडली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कॉ. सय्यद रज्जाक, बाबासाहेब सरवदे, बळीराम भुंबे, सुदाम शिंदे आदी उपस्थित होते. शिवाय शेतमजुरांसाठी कल्याणकारी बोर्ड स्थापन करुन बेघर असणाऱ्यांना त्याचे वाटप करण्यात यावे, दीडशे दिवसांपेक्षा जास्त रोहयोवर काम केलेल्या मजुरांची नावे मस्टरवर घेतली जात नाहीत, यामध्ये नियमितता आणण्याची मागणी शेतमजुरांनी केली आहे.
कारवाईची मागणी
माजलगाव पंचायत समितीच्या इमारत बांधकामात कनिष्ठ अभियंता व गटविकास अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखोंचा अपहार झाला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे चालू वेतन बंद करून कारवाई करण्याची मागणी शेख जुनैद शेख निजाम व इतर नागरिकांनी केली आहे. मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. (प्रतिनिधी)
स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया जिल्हा कमिटीच्या वतीने दुष्काळी परिस्थितीमुळे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पुढील वर्षी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळावा या मागण्यांसाठी व कन्हैया कुमारच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे आयुक्तालयासमोरील आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर झालेले गुन्हे परत घेण्याची मागणी यावेळी एस.एफ.आय.च्या वतीने करण्यात आली. आंदोलनात रोहिदास जाधव, सुहास झोडगे, अमोल वाघमारे, सोपान भुंबे, लहू खारगे, गोविंद निरडे, रंगनाथ अडागळे, दत्ता सुरवसे, युवराज मांजरे, रजनीश पतंगे, सुहास विद्यागर उपस्थित होते.

Web Title: Movement, fasting Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.