‘टिना’च्या कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीसाठी आंदोलन
By Admin | Published: April 6, 2016 12:18 AM2016-04-06T00:18:21+5:302016-04-07T00:26:20+5:30
लातूर : एमआयडीसीतील एडीएम अॅग्रो इंडस्ट्रीज तथा टिना येथील ३३० कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी कामबंद आंदोलन मंगळवारी सुरू केले़ मागील
लातूर : एमआयडीसीतील एडीएम अॅग्रो इंडस्ट्रीज तथा टिना येथील ३३० कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी कामबंद आंदोलन मंगळवारी सुरू केले़ मागील १२ वर्षांपासून येथील कर्मचाऱ्यांना केवळ अल्प वेतनावर काम राबविले जात आहे़ स्थानिक कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला़
प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कुटुंबासह वैद्यकीय सेवा मिळावी़ किमान २० हजार रूपये वेतन द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी कंपनीकडे केली आहे़ मंगळवारी कर्मचाऱ्यांनी काम बंद करून कंपनीसमोर ठिय्या आंदोलन केले़ तसेच पगारवाढ झालीच पहिजे, अशा घोषणा दिल्या़ कंपनीत बड्या अधिकाऱ्यांना तीन लाख वेतन आहे़ मात्र, सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना महिनाभर त्याचे कुटुंब पोटभर खाईल एवढेही वेतन दिले जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला़
यावेळी शिवाजी वलसे, आनंद नखाते, चंद्रकांत कुलकर्णी, गोविंद कुलकर्णी, नंदकिशोर कदम, बालाजी हंचाटे, अच्युत पवार, गणेश क्षीरसागर, किरण गोमारे, गणेश जाधव, विजय चौगुले, राजेंद्र वाघमारे आदींची उपस्थिती होती़