जुन्या पेन्शनसाठी काळ्या फिती लावून शिक्षकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:56 PM2019-06-17T23:56:20+5:302019-06-17T23:56:44+5:30
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी विविध शिक्षक संघटनांतर्फे शाळेच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. शासनाने मागणी मान्य करेपर्यंत विविध मार्गांनी शासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचेही शिक्षक संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
औरंगाबाद : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी विविध शिक्षक संघटनांतर्फे शाळेच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. शासनाने मागणी मान्य करेपर्यंत विविध मार्गांनी शासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचेही शिक्षक संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
शासनाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत आलेल्या; परंतु संबंधित शाळेला अनुदान नसणाऱ्या किंवा टप्पा अनुदानावर असलेल्या शाळेतील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना बंद केली. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे क्रमप्राप्त असून, तो त्यांचा हक्क आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची नियुक्ती असल्याने त्या सर्व शिक्षकांना नियम, कायद्याप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वेळोवेळी लक्ष वेधले, तरीही शासनाने दुर्लक्ष केल्याने राष्ट्रवादी शिक्षक संघ, पुरोगामी शिक्षक-शिक्षकेतर संघटना, नॅशनल टीचर्स युनियन, उर्दू शाळा संघर्ष समिती, विनाअनुदानित कृती समिती या संघटनांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी (दि. १७) काळ्या फिती लावून आंदोलन केले. त्यानंतर शिक्षण उपसंचालक व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे, प्रा. बंडू सोमवंशी, वाहेद शेख, प्रवीण वेताळ, इल्लाउद्दीन फारुकी, नितीन कवडे, प्रदीप डोणगावे, सुनील शेरखाने, बालाजी भगत, सिद्धेश्वर कस्तुरे, रवी खोडाळ, गुलाब शेख, सुधाकर पवार, दिलीप कोळी, डी. आर. चव्हाण, शाहूराज मुंगळे, चंद्रकांत चव्हाण, विजय साबळे, विजय चव्हाण, मिर्झा सलीम बेग, प्रा. शेख मनसूद, प्रल्हाद शिंदे, परवेज कादरी, इमाम सर, मिर्झा इजाज बेग यांची उपस्थिती होती.