सुप्रिया सुळे रमल्या वेरूळ लेण्यांमध्ये; पर्यटनादरम्यान जाणून घेतली 'या' जगप्रसिद्ध पदार्थाची रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 06:00 PM2021-09-20T18:00:52+5:302021-09-20T18:36:42+5:30

MP Supriya Sule Visit's Aurangabad : खा. सुप्रिया सुळे या देवगिरीच्या संपुर्ण किल्ला परिसराची पाहणी करत थेट किल्ल्याच्या शेवटपर्यंत गेल्या.

MP Supriya Sule visit's Ellora Caves and Devgiri fort; Recipe of world famous food 'Khaja' learned during tourism | सुप्रिया सुळे रमल्या वेरूळ लेण्यांमध्ये; पर्यटनादरम्यान जाणून घेतली 'या' जगप्रसिद्ध पदार्थाची रेसिपी

सुप्रिया सुळे रमल्या वेरूळ लेण्यांमध्ये; पर्यटनादरम्यान जाणून घेतली 'या' जगप्रसिद्ध पदार्थाची रेसिपी

googlenewsNext

खुलताबाद ( औरंगाबाद ) : संसदरत्न खा. सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) सध्या पर्यटन राजधानीत कुटुंबातील काही मोजक्या लोकांसोबत भटकंतीचा आस्वाद घेत आहेत. त्यांनी आज सकाळी दौलताबाद येथील भक्कम देवगिरी किल्ल्यास ( Doulatabad Fort ) भेट दिली. त्यानंतर खा. सुळे जागतिक वारसास्थळ असलेल्या वेरुळ लेणी ( Ellora Caves ) पाहण्यास पोहोचल्या. प्रारंभी वेरुळ येथील १६ क्रमांकाच्या कैलास लेणीची ( Kailasa Cave ) त्यांनी तास़भर पाहणी केली. तसेच आजच्या दौऱ्यात त्यांनी खुलताबाद येथील 'खाजा' या जगप्रसिद्ध पदार्थाची रेसिपीसुद्धा जाणून घेतली. ( MP Supriya Sule visit's Ellora Caves and Devgiri fort; Recipe of world famous food 'Khaja' learned during tourism) 

जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरुळ येथील कैलास लेणी मधील भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला पाहून खा. सुप्रिया सुळे भारावल्या. कुटुंबातील मोजक्याच लोकांबरोबर त्यांनी तीन तास लेणी बघीतली. यानंतर येथील हिंदू  ,बौध्द व जैन धर्मिय लेणींची त्यांनी पाहणी केली. लेणी परिसरातील आकर्षक असलेल्या धबधब्यासही भेट देवून निसर्गसौंदर्याचा आंनद घेतला. 

खा. सुप्रिया सुळे यांचा वेरूळ लेणी दौरा हा खाजगी व कौटुंबिक असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते निलेश राऊत, संतोष माने पाटील असे मोजकेच पदाधिकारी त्यांच्या सोबत होते. मात्र, ते ही दूर दुर होते. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक व इतिहासतज्ञ डॉ. दुलारी कुरैशी यांनी वेरूळच्या शिल्पाबाबत खा. सुळे यांनी माहिती दिली. मंगळवारी खा. सुप्रिया सुळे या अजिंठा लेणीस भेट देणार आहेत.

प्रांरभी खा. सुप्रिया सुळे यांनी सकाळी आठ वाजता दौलताबाद येथील अजिंक्य देवगिरी किल्ल्यास भेट देवून पाहणी केली. संपुर्ण किल्ला परिसराची पाहणी करत थेट किल्ल्याच्या शेवटपर्यंत गेल्या. विशेष म्हणजे साडेतीन तास त्यांनी देवगिरी किल्ला परिसरातील माहिती घेवून गडकिल्ल्याचा आंनद घेतला. तसेच खुलताबाद येथील जगप्रसिद्ध 'खाजा' या पदार्थाच्या दुकानास खा. सुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी 'खाजा'ची निर्मिती प्रक्रिया जाणून घेतली. 

Web Title: MP Supriya Sule visit's Ellora Caves and Devgiri fort; Recipe of world famous food 'Khaja' learned during tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.