"मोट बांधण्याच्या भानगडीत पडू नका, फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो..."; मनोज जरांगे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 07:39 PM2024-06-22T19:39:52+5:302024-06-22T19:41:08+5:30
"ओबीसींची मोट बांधण्याचे काम कराल, जर हा तुमचा डाव असेल, तर मनोज जरांगे यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठा समाजही होऊ देणार नाही. तुम्ही संपूर्ण मोट बांधली तरीही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे."
मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो, मोट बांधण्याच्या भानगडीत पडू नका. ओबीसींची मोट बांधून पाठबळ द्याल आणि मराठ्यांवर अन्याय कराल, तर तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब, मराठ्यांशिवाय या महाराष्ट्रात पान नाही हालू शकत. एवढेच नाही, तर त्यांना (ओबीसी) पाठबळ द्याल आणि त्या सर्वांना आमच्या अंगावर घालाल आणि ओबीसींची मोट बांधण्याचे काम कराल, जर हा तुमचा डाव असेल, तर मनोज जरांगे यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठा समाजही होऊ देणार नाही. तुम्ही संपूर्ण मोट बांधली तरीही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांसोबत बोलत होते.
जरांगे म्हणाले, "आमच्या आंदोलनामुळे जातीय तेढ निर्माण होत असल्याचे म्हणाले, आता त्यांचा बसल्यावर नाही झाली का जातीय तेढ निर्माण? ते बसल्यावर नाही का गर्दी झाली? ते गेल्यावर नाही का एसटी थांबायला त्रास झाला? ते बसल्यावर नाही का शाळेत जाणाऱ्या लोकांना त्रास झाला? हे काम छगण भुजबळ करत आहेत. त्या आंदोलन करणाऱ्यांना दोषच नाही आमचा. कारण छगण भुजबळ यांनी जाहीर सांगितले आहे की, ते माझे लोक आहेत. मी बसवले आहेत. म्हणजे तू घडवून आणतो. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कळत नाही का हे? मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो, मोट बांधण्याच्या भानगडीत पडू नका. ओबीसींची मोट बांधून पाठबळ द्याल आणि मराठ्यांवर अन्याय कराल, तर तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब, मराठ्यांशिवाय या महाराष्ट्रात पान नाही हालू शकत."
जर हा तुमचा डाव असेल, तर मनोज जरांगे यशस्वी होऊ देणार नाही -
"तुम्ही आम्हालाही चुचकारताल फडणवीस साहेब आणि त्यांनाही चुचकारताल आणि पुन्हा मराठ्यांचा घात कराल. नेरेटिव्ह पसरवला, नरेटिव्ह पसरवला, तो मी भरून काढणार आहे, या नावाखाली त्यांना पाठबळ द्याल आणि त्या सर्वांना आमच्या अंगावर घालाल आणि ओबीसींची मोट बांधण्याचे काम कराल, जर हा तुमचा डाव असेल, असेल तर म्हणतोय मी. मनोज जरांगे यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठा समाजही होऊ देणार नाही. तुम्ही संपूर्ण मोट बांधली तरीही," असेही जरांगे म्हणाले.
तर एकही मराठा त्यांच्यासोहत राहणार नाही -
"मराठ्यांवर १३ तारखेपर्यंत अन्याय झाला, तर मराठे एकिकडून आहेत. तुमच्या पक्षातील सुद्धा. ते सुद्धा आता सहन करू शकत नाहीत, मराठ्यांचे नेते. जर तुमच्या पक्षातील मराठा नेते एवढा मोठा डोळ्यासमोर होणारा अन्याय बघून, सहन करून तुमच्या सोबतच राहीले, तर एकही मराठा त्यांच्यासोहत राहणार नाही. कारण भाजपमधील मराठ्यांची जात वाचवणेही जबाबदारी आहे. फडणवीस साहेब तुम्ही तो डाव टाकू नका. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, असेही जरांगा यावेळी म्हणाले.