एमआर, स्कोडा संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:12 AM2017-12-10T01:12:07+5:302017-12-10T01:12:41+5:30

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या सहाव्या राम कमला औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत एमआर इलेव्हन संघाने आयुर्विमा संघावर तर स्कोडा आॅटो संघाने पीडब्ल्यूडी संघावर १० धावांनी मात केली. विपुल भोंडे व सिराज काझी हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.

MR, SKODA team won | एमआर, स्कोडा संघ विजयी

एमआर, स्कोडा संघ विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या सहाव्या राम कमला औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत एमआर इलेव्हन संघाने आयुर्विमा संघावर तर स्कोडा आॅटो संघाने पीडब्ल्यूडी संघावर १० धावांनी मात केली. विपुल भोंडे व सिराज काझी हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.
पहिल्या सामन्यात एलआयसी संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकांत सर्वबाद ८० धावा केल्या. त्यांच्याकडून दिनेश नाकीलने २८ चेंडूंत ४ चौकारांसह २४ धावा केल्या. एमआर इलेव्हनकडून सिराज काझीने ७ धावांत ३ गडी बाद केले. त्याला व्यंकटेश सोनवलकर व सय्यद जलील यांनी २ गडी बाद करून साथ दिली. प्रत्युत्तरात एमआर इलेव्हन संघाने ६ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून ऋषिकेश नायरने २० चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह नाबाद ३० व शेख वसीमने १२ चेंडूंत २ चौकार, २ षटकारांसह २८ धावा केल्या. आयुर्विमा संघाकडून सुशील गणोरकरने २९ धावांत ३ व दिनेश नाकीलने २ गडी बाद केले.
दुसºया सामन्यात स्कोडा आॅटोने शैलीदार फलंदाज करून विपुल भोंडे याच्या ३३ चेंडूंतील ६ चौकारांसह फटकावलेल्या ५२ धावांच्या बळावर २० षटकांत सर्वबाद १०८ धावा केल्या. विपुल भोंडेशिवाय संदीप खोसरेने १८ धावा केल्या. पीडब्ल्यूडीकडून मनोज घोडकेने २२ धावांत ३ आणि नीरज देशपांडेने १६ धावांत ३ गडी बाद केले. मनोज दाभाडेने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पीडब्ल्यूडीचा संघ १९.४ षटकांत ९८ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून मनोज दाभाडेने ३० व असद अली याने २८ व योगेश चव्हाणने १६ धावा केल्या. स्कोडा संघाकडून विजय मेहेत्रेने १५ धावांत ४ व योगेश भागवतने ४ धावांत ३ गडी बाद केले. शेख नझीमने २६ धावांत २ बळी घेतले.

Web Title: MR, SKODA team won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.