महावितरणचे दोन कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:00 AM2017-10-28T01:00:54+5:302017-10-28T01:01:00+5:30

महावितरणच्या नांदेड शहर विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ तंत्रज्ञ अशा दोन कर्मचाºयांना थकबाकी असलेल्या ठिकाणी नव्याने वीज जोडणी दिल्यामुळे कामात अनियमीतता आणि गैरकृत्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.

MSEDC employees suspended | महावितरणचे दोन कर्मचारी निलंबित

महावितरणचे दोन कर्मचारी निलंबित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड:महावितरणच्या नांदेड शहर विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ तंत्रज्ञ अशा दोन कर्मचाºयांना थकबाकी असलेल्या ठिकाणी नव्याने वीज जोडणी दिल्यामुळे कामात अनियमीतता आणि गैरकृत्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.
नांदेड शहर विभागातील सदगुरू गजानन अपार्टमेंट वाडी बु. पावडेवाडी नाका येथील एका ग्राहकाचा वीज पुरवठा ३ लाख ७५ हजार ६९० रूपयांच्या थकीत बिलापोटी खंडीत करण्यात आला होता. गुरुवारी नांदेड मंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या पथकाने सदरील वीज ग्राहकाची तपासणी केली असता, ग्राहकाच्या थकबाकी असलेल्या मीटरचा वीजपुरवठा तात्पुरता बंद असल्याचे आढळून आले़ मात्र त्याच ठिकाणी इतर १४ वीजग्राहकांना नव्याने वीज जोडणी देण्यात आल्याचे निदर्शनास आले.
थकबाकी असलेल्या ठिकाणी वीज जोडणी देवून महावितरण प्रशासनाची दिशाभूल केल्यामुळे महावितरणचा सुमारे ३ लाख रुपयांचा महसूल ठप्प झाला़ ज्या वीजग्राहकाकडे वीजबिलाची थकबाकी असेल अशा ग्राहकाला अथवा त्या जागेवर नव्याने वीज जोडणी देता येत नाही़ परंतु संबंधीत ठिकाणचा पदभार असलेले कनिष्ठ अभियंता राजकिरण लांडगे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ दिवाकर जोशी यांनी नव्याने त्याच ठिकाणी १४ वीजजोडण्या दिल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कर्मचारी सेवा विनिमयाच्या तरतुदीनुसार दोन्ही कर्मचाºयांना निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: MSEDC employees suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.