प्रकाशोत्सवात अखंडित विजेसाठी महावितरण अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 07:26 AM2020-11-12T07:26:53+5:302020-11-12T07:26:53+5:30
दिवाळीत प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळी वीजपुरवठा खंडित होणार नाही, यादृष्टीने दक्षता घेतली जाणार आहे. कोणताही सण-उत्सव असो, वीज सुरळीत ...
दिवाळीत प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळी वीजपुरवठा खंडित होणार नाही, यादृष्टीने दक्षता घेतली जाणार आहे. कोणताही सण-उत्सव असो, वीज सुरळीत राहील यासाठी प्रयत्न केला जातो. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. किमान या काळात वीजपुरवठा विस्कळीत होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यानुसार महावितरणची यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात आले.
दिवाळी साजरी करताना विद्युत उपकरणांपासून सुरक्षित राहावे. फटाके फोडतानाही काळजी घ्यावी. फटाके फोडताना डीपी किंवा वीज वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल अशा पद्धतीने फटाके उडवू नयेत. रोषणाईवेळी घराची अर्थिंग तपासावी, यासाठी वीज वाहिन्यांवर आकडे टाकू नयेत, असे आवाहन केले आहे.