महावितरणने तोडली कृषीपंपाची वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:00 AM2017-10-30T00:00:46+5:302017-10-30T00:00:50+5:30
राज्य शासनाने दिवाळीनंतर शेतकºयांना जोराचा झटका देत तालुक्यातील दोन गावांतील कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. दोन्ही गावांत तीन विद्युत रोहित्रांवरुन कृषी पंपाला वीजपुरवठा केला जातो होता. या गावांमध्ये तब्बल १८ लाख रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, ऐन रब्बी हंगामाच्या पेरण्यांमध्ये शेतकºयांसमोर नवे संकट उभे टाकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : राज्य शासनाने दिवाळीनंतर शेतकºयांना जोराचा झटका देत तालुक्यातील दोन गावांतील कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. दोन्ही गावांत तीन विद्युत रोहित्रांवरुन कृषी पंपाला वीजपुरवठा केला जातो होता. या गावांमध्ये तब्बल १८ लाख रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, ऐन रब्बी हंगामाच्या पेरण्यांमध्ये शेतकºयांसमोर नवे संकट उभे टाकले आहे.
वीज वितरण कंपनीने मागील काही दिवसांपासून वीज बिलाची थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक कामांसाठी वापरण्यात येणाºया विजेची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी तालुक्यात मोहीम राबविली जात आहे. काही दिवसांपूर्वीच वीजपुरवठ्यापोटी ९० लाख रुपयांची थकबाकी असल्याने सहा गावांचा वीजपुरवठा कंपनीने खंडित केला होता. त्यानंतर कंपनीने ही मोहीम आता गतीमान केली आहे. तालुक्यात घरगुती वीज बिलाच्या वसुलीबरोबरच कृषीपंपांच्या वसुलीवरही अधिकाºयांनी भर दिला आहे. कंपनीचे अभियंते आणि लाईनमन गावोगावी फिरत असून, वसुली भरा अन्यथा वीज तोडली जाईल, असा इशारा दिला जात आहे. शनिवारी गोपेगाव आणि निवळी येथील विद्युत रोहित्रांवरुन कृषी पंपासाठी वीजपुरवठा केला जातो. दोन्ही गावात १८ लाख रुपये थकबाकी आहे. २८ आॅक्टोबर रोजी तिन्ही विद्युत रोहित्राचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. त्यामुळे सध्या गावात अंधार आहेत.