वाळूजमहानगरात महावितरणतर्फे ‘एक गाव-एक दिवस’उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:32 AM2020-12-17T04:32:57+5:302020-12-17T04:32:57+5:30

वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात महावितरणतर्फे ‘एक गाव-एक दिवस’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत वीज ग्राहकांच्या ...

MSEDCL launches 'One Village-One Day' initiative in Waluj | वाळूजमहानगरात महावितरणतर्फे ‘एक गाव-एक दिवस’उपक्रम

वाळूजमहानगरात महावितरणतर्फे ‘एक गाव-एक दिवस’उपक्रम

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात महावितरणतर्फे ‘एक गाव-एक दिवस’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत वीज ग्राहकांच्या समस्या सोडवून प्रलंबित कामाचा निपटारा करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या ७० ग्राहकांना पकडण्यात आले आहे.

वाळूज सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या रांजणगाव, जोगेश्वरी, विटावा, वाळूज, नारायणपूर, घाणेगाव आदी १० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावात सहायक अभियंता पी. पी. खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक गाव-एक दिवस’ हा उपक्रम राबविला जात आहेत. या उपक्रमांर्गत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी गावात फिरुन ग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. गावातील लोंबकळणाऱ्या धोकादायक विद्युत तारा, उघडे ट्रॉन्सफार्मर, केबल बदलणे, फ्युज बॉक्स बदलणे, वीजचोरी रोखणे, विजेच्या तारा व विद्युत डीपींना अडथळा ठरणाऱ्या झांडाच्या फांद्या तोडणे, नादुरुस्त झालेले वीज मीटर बदलुन देणे आदी स्वरुपाची कामे करण्यात येत आहेत. बुधवारी महावितरणच्या पथकाने गावात ठिकठिकाणी भेटी देऊन वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेली विद्युत डीपी हटविण्याची मागणी नागरिकांनी केली. यावेळी सहायक अभियंता यांनी विद्युत डीपी हटविण्याचा खर्च ग्रामपंचायतीने केल्यास ही डीपी इतरत्र स्थलांतरित करण्यास सहमती दर्शविली. ही मोहीम राबविण्यासाठी वाळूज सबस्टेशनचे सहायक अभियंता पी. पी. खंडागळे, सचिन केळकर, अकील पठाण, आनंद बडसावणे, जाधव, शिंदे, तवणे आदी कर्मचारी परिश्रम घेत आहे.

वीजचोरी करणाऱ्या ७० जणांवर कारवाई

महावितरणच्या ‘एक गाव-एक दिवस’ या उपक्रमांतर्गत वाळूज गावातील हनुमाननगर, श्रीरामनगर, पत्रा कॉलनी आदी परिसरातील आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या ७० ग्राहकांना पथकाने पकडले आहे. वीजचोरी करणाऱ्या या ग्राहकांकडून वीजचोरीची रक्कम वसूल केली जाणार आहे. पैसे न भरणाऱ्या ग्राहकांविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे खंडागळे यांनी सांगितले.

फोटो ओळ- वाळूज परिसरात महावितरणने ‘एक गाव- एक दिवस’ हा उपक्रम राबवून वीज ग्राहकांच्या समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न केला.

------------------------

Web Title: MSEDCL launches 'One Village-One Day' initiative in Waluj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.