महावितरणचे ‘कृत्रिम’ भारनियमन ! अगोदरच टंचाई त्यात पाणीपुरवठा सुरू होताच वीज होते गुल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 11:41 AM2022-04-04T11:41:01+5:302022-04-04T11:42:27+5:30

वसुलीतील आपले अपयश झाकण्यासाठी महावितरण सर्वच ग्राहकांना कसे काय वेठीस धरू शकते, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

MSEDCL's 'artificial' laod shading in Aurangabad, Already there is scarcity, electricity gone off while tap water comes | महावितरणचे ‘कृत्रिम’ भारनियमन ! अगोदरच टंचाई त्यात पाणीपुरवठा सुरू होताच वीज होते गुल

महावितरणचे ‘कृत्रिम’ भारनियमन ! अगोदरच टंचाई त्यात पाणीपुरवठा सुरू होताच वीज होते गुल

googlenewsNext

औरंगाबाद : महावितरण कंपनीने मागील काही दिवसांपासून सकाळी ६ ते ७ या वेळेत भारनियमन सुरू केले आहे. अगोदरच पाणीटंचाईने औरंगाबादकर त्रस्त आहेत. त्यात पाणीपुरवठा सुरू झाला की, वीजपुरवठा बंद होतो. त्यामुळे महावितरणच्या ‘अघोषित’ भारनियमनाला नागरिक प्रचंड वैतागले आहेत.

रविवारी सकाळी शहरातील ११ फिडरवर महावितरणकडून सकाळी ६ ते ७ यावेळेत भारनियमन करण्यात आले. एका फिडरवर किमान १२०० ग्राहक असतात. १३ हजार २०० नागरिकांना भारनियमनाचा शॉक देण्यात आला. याचे कारणही अफलातून आहे. ज्या भागात वसुली कमी आहे, त्याच फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. एका फिडरवरील किमान एक हजार ग्राहक प्रामाणिकपणे विजेचे बिल भरतात. २०० ग्राहक बिल भरतच नाहीत. त्यामुळे या २०० ग्राहकांची शिक्षा इतर एक हजार ग्राहकांना का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जे ग्राहक बिल भरत नाहीत, त्यांची थेट वीज कापण्यात यावी. वसुलीतील आपले अपयश झाकण्यासाठी महावितरण सर्वच ग्राहकांना कसे काय वेठीस धरू शकते, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

पाणीपुरवठा सुरू होताच महावितरणकडून सकाळी भारनियमन करण्यात येते. नागरिकांना मोटारीशिवाय एक थेंबही पाणी मिळत नाही. महापालिका वीजपुरवठा पूर्ववत झाल्यावर परत पाणीपुरवठाही करीत नाही. एकदा पाणी मिळाले नाही तर किमान ७ दिवस वाट पाहावी लागते. रविवारी भडकलगेट, टाऊन हॉल भागात पाणीपुरवठा सुरू होताच भारनियमन करण्यात आले.

आपले अपयश झाकण्यासाठी...
पवित्र रमजान महिना सुरू झाला. लवकरच आंबेडकर जयंती येत आहे. महावितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन बंद करावे. अन्यथा लोकशाही मार्गाने महावितरणला धडा शिकवण्यात येईल.
- खाजा शरफोद्दीन, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

Web Title: MSEDCL's 'artificial' laod shading in Aurangabad, Already there is scarcity, electricity gone off while tap water comes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.