मुगाची आवक वाढली
By Admin | Published: October 10, 2016 12:23 AM2016-10-10T00:23:48+5:302016-10-10T00:33:20+5:30
जालना : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे मूग, तूर तसेच इतर कडधान्य जोमात आले आहेत.
जालना : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे मूग, तूर तसेच इतर कडधान्य जोमात आले आहेत. जालना बाजार समितीतही दिवसाकाठी एक हजार क्विंटलपेक्षा अधिक मुगाची आवक होत आहे.
जालना बाजार समितीत पंधरा ते वीस दिवसांपासून नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे. भावही चांगला असल्याने शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांसोबतच बाजार समितीत मुगाची विक्री करीत आहेत. प्रतवारीनुसार साडेतीन ते साडेचार दरम्यान प्रति क्विंटल मुगाला भाव मिळत आहे. आतापर्यंत दहा हजार क्विंटलपेक्षा जास्त मुगाची आवक झाली आहे. येत्या काही दिवसांत सोयाबीनची आवक सुरू होईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. मोसंबीची आवकही दिवसाकाठी दहा ते पंधरा टन दरम्यान होत आहे. मोसंबीच्या भावात चढ-उतार असला तरी आवक चांगली आहे.