गुरुजींच्या गौरवाला यंदा मिळणार मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:28 AM2017-08-25T00:28:32+5:302017-08-25T00:28:32+5:30

जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गुरूगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते़ परंतु मागील तीन वर्षापासून हे पुरस्कार रखडले आहेत़ शिक्षण विभागाने गुरूवारी या विषयावर बैठक घेऊन यावर्षी शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे़

 Muhurat will receive this year's gaurav | गुरुजींच्या गौरवाला यंदा मिळणार मुहूर्त

गुरुजींच्या गौरवाला यंदा मिळणार मुहूर्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गुरूगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते़ परंतु मागील तीन वर्षापासून हे पुरस्कार रखडले आहेत़ शिक्षण विभागाने गुरूवारी या विषयावर बैठक घेऊन यावर्षी शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे़
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाºया जिल्ह्यातील एक प्राथमिक व एक माध्यमिक शिक्षकास गुरूगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते़ १६ तालुक्यातील प्रत्येकी २ या प्रमाणे ३२ व एक विशेष अशा ३३ शिक्षकांना हे पुरस्कार देण्यात येतो़ मागील तीन वर्षापासून हे पुरस्कार वितरीत करण्यात आले नव्हते़ २०१४ ते २०१६ या वर्षातील रखडलेले पुरस्कार व २०१७ मधील पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा एकाच सोहळ्यात सन्मान करण्याचा विषय आजच्या बैठकीत पुढे आला़
यावेळी पदाधिकाºयांनी चार वर्षाच्या पुरस्काराचे नियोजन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या़
यावर्षीचे प्रस्ताव मागविण्यात आले असून पुरस्कारासाठी लवकर निवड करण्यात येणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी शिवाजी खुडे यांनी सांगितले़ दरम्यान, मागील तीन वर्षाचे पुरस्कार घोषीत होवून सुद्धा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे वितरण होवू शकले नाही़ यावर्षी पदाधिकाºयांनी पुढाकार घेतल्याने शिक्षकांनी आनंद व्यक्त केला़

Web Title:  Muhurat will receive this year's gaurav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.