स्थापनेपासून मुखपाट ग्रामपंचायत बिनविरोधच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:04 AM2021-01-09T04:04:56+5:302021-01-09T04:04:56+5:30
पिंपळदरी : सिल्लोड तालुक्यातील मुखपाट येथील ग्रामपंचायतीमध्ये स्थापन झाल्यापासून एकदाही निवडणूक झाली नाही. ग्रामस्थांच्या समजुतदारपणामुळे येथे नेहमी बिनविरोध निवडणुका ...
पिंपळदरी : सिल्लोड तालुक्यातील मुखपाट येथील ग्रामपंचायतीमध्ये स्थापन झाल्यापासून एकदाही निवडणूक झाली नाही. ग्रामस्थांच्या समजुतदारपणामुळे येथे नेहमी बिनविरोध निवडणुका पार पडल्या आहेत. या वर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. तीस वर्षांपासून या ग्रामपंचायतचे नेतृत्व अशोक सूर्यवंशी हे करतात.
मुखपाटची लोकसंख्या १६०० असून मतदारांची संख्या ६५० आहे. त्यात महिला मतदारांची संख्या २९८ तर पुरुष मतदारांची संख्या ३५२ आहे. ग्रामपंचायत सदस्य संख्या सात आहे. प्रत्येक वेळेस गावातील सर्व समाजातील लोकांना प्रतिनिधित्व देण्यात येते. जेणेकरून कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. यामुळे गावात लोक एकोप्याने राहतात. विशेष म्हणजे या गावात सर्व पक्षांचे कार्यकर्ते नेते आहेत; मात्र ग्रामपंचायतची निवडणूक आली की सर्व जण एकत्र येऊन बिनविरोधचा निर्णय घेतात.
कोट
गावातील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी व माझ्या गावातील सर्व गावकरी, कार्यकर्ते, नेते निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उत्सुक असतात. यामुळेच गावात विविध विकासकामे झाली असून कोणताही वाद नाही. गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होत नाही.
अशोक नवलसिंग सूर्यवंशी, मुखपाट
फोटो : ग्रामपंचायतचा