मल्टिफंक्शनल स्टोअर शेड उभारणीचे काम रखडले

By Admin | Published: September 20, 2014 12:10 AM2014-09-20T00:10:26+5:302014-09-20T00:27:20+5:30

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यावर जून महिन्यात मल्टिफंक्शनल स्टोअर गुडस् शेड उभारण्याचे काम हाती घेण्यात आले.

Multifunctional store sheds have been completed | मल्टिफंक्शनल स्टोअर शेड उभारणीचे काम रखडले

मल्टिफंक्शनल स्टोअर शेड उभारणीचे काम रखडले

googlenewsNext

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यावर जून महिन्यात मल्टिफंक्शनल स्टोअर गुडस् शेड उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. तीन महिन्यांत शेड उभारणीचे काम पूर्ण होणार होते. परंतु कॉलम उभारणीच्या कामानंतर पुढील काम रखडल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे.
रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यावर गोदामाची क्षमता कमी असल्याने पावसाळ्यात माल कुठे उतरवून घ्यायचा ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. माल उघड्यावर ठेवून नंतर त्याची उचल करावी लागत आहे. यातून माल पावसात भिजल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे पावसाळ्यात सुरक्षितरीत्या माल उतरविण्यासाठी आणि ठेवण्यासाठी शेडची सोय करून देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. रेल्वेच्या वतीने जून महिन्यात मालधक्क्यावर शेडचे काम सुरू करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात ट्रकमध्ये माल भरण्यासाठी आणि वेळप्रसंगी माल ठेवण्यासाठी या शेडचा वापर करता येणार आहे. तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार होते. परंतु सप्टेंबर महिना सुरू होऊनही या ठिकाणी केवळ शेडच्या कॉलमचे काम पूर्ण झाले आहे. पुढील काम रखडल्याचे दिसून येत आहे.
महिनाभरात काम पूर्ण
एकाच वेळी अनेक कामे सुरू असल्याने शेड उभारणीचे काम थांबल्याचे दिसते. परंतु आगामी महिनाभरात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Multifunctional store sheds have been completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.