२७ सप्टेंबरपासून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:55 PM2019-07-22T22:55:29+5:302019-07-22T22:55:46+5:30

औरंगाबाद शहराहून तब्बल एकवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुन्हा एकदा उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.

Mumbai-Aurangabad-Udaipur Airlines service from September 27 | २७ सप्टेंबरपासून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा

२७ सप्टेंबरपासून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद शहराहून तब्बल एकवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुन्हा एकदा उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडियाकडून २७ सप्टेंबरपासून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर अशी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा चालविण्यात येणार आहे. त्यामुळे उदयपूरसाठी विमानसेवेची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर दिवाळीपूर्वी संपणार आहे आणि औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ होणार आहे.


औरंगाबाद शहर हे दोन दशकांपूर्वी राजस्थानशी विमानसेवेने जोडलेले होते. त्यामुळे शहरात जयपूर-उदयपूरहून येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या होती. देशांतर्गत पर्यटनाला मोठी चालना मिळत होती. औरंगाबादला आल्यानंतर जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणीला पर्यटक भेट देत. त्यातून पर्यटन व्यवसायदेखील वाढत असे; परंतु ही विमानसेवा बंद झाली आणि पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला. वीस वर्षांपासून ही विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.


१२ जून रोजी दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळाची एअर इंडियाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी आणि कार्यकारी संचालक मीनाक्षी मलिक यांच्यासोबत बैठक झाली होती. यावेळी सर्वांनी एकत्रित मागणी केल्याने एअर इंडियाकडून ही विमानसेवा दिवाळीपूर्वी सुरू करण्यासाठी आश्वासन मिळाले होते. आश्वासनानुसार अखेर एअर इंडियाने दिवाळीपूर्वी ही विमानसेवा सुरु करण्याचे जाहीर केले आहे.


एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेल्या शिष्टमंडळात हॉटेल उद्योजक सुनीत कोठारी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले, सचिव नितीन गुप्ता, इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरचे अध्यक्ष प्रणब सरकार आणि इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरचे उपाध्यक्ष राजीव मेहरा यांचा समावेश होता. 

Web Title: Mumbai-Aurangabad-Udaipur Airlines service from September 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.