मुंबई, पाटील अकॅडमी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:35 AM2018-01-30T00:35:10+5:302018-01-30T00:35:16+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरवारे क्रीडा संकुलाच्या क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत सहारा मुंबई संघाने फ्रेण्डस् इलेव्हन संघावर मात केली. दुसºया सामन्यात पाटील स्पोर्टस् महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट संघावर विजय मिळवला.

 Mumbai, Patil Academy won | मुंबई, पाटील अकॅडमी विजयी

मुंबई, पाटील अकॅडमी विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरवारे क्रीडा संकुलाच्या क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत सहारा मुंबई संघाने फ्रेण्डस् इलेव्हन संघावर मात केली. दुसºया सामन्यात पाटील स्पोर्टस् महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट संघावर विजय मिळवला.
फ्रेण्डस् इलेव्हनविरुद्ध सहारा मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ६ बाद १६५ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून अवधूत दांडेकरने ३१ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ४७, राहुल देसाईने २५ आणि विशांत मोरे याने २४ धावा केल्या. फ्रेण्डस् इलेव्हनकडून वाल्मीक मुळे, राम पाटील, इशांत राय, सुशील गणोरकर व रोहन जाधव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात फ्रेण्डस् इलेव्हन संघ १६.२ षटकांत ८७ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अशोक शिंदे (२६) व रोहन जाधव (१२) हेच दोघे दुहेरी आकडी धावा पार करू शकले. मुंबईकडून अक्षय दरेकर याने ८ धावांत ४ गडी बाद केले. कौस्तुभ भाटे, वैभव चौगुले, धवल हेमनानी, मानसिंग निगडे व अवधूत दांडेकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अक्षय दरेकर सामनावीर ठरला.
दुसºया सामन्यात महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटने पाटील स्पोर्टस् अकॅडमीविरुद्ध २0 षटकांत ९ बाद ११७ धावा केल्या. त्यांच्याकडून राकेश छाजेडने ४ चौकारांसह ४३ व अक्षय गिरेवाडने २0 धावा केल्या. पाटील अकॅडमीकडून विश्वराज शिंदेने १५ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पाटील अकॅडमीने विजयी लक्ष्य १३.५ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले. त्यांच्याकडून अजिंक्य अखाडेने २१, अविनाश शिंदेने २२ धावा केल्या. महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट संघाकडून प्रशांत वाहूळ व करण पतंगे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

Web Title:  Mumbai, Patil Academy won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.