मुंबईतील पोलीस शिपायाची हिंगोलीत गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 01:15 PM2020-02-14T13:15:55+5:302020-02-14T13:16:55+5:30

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही

Mumbai police constable commits suicide in Hingoli | मुंबईतील पोलीस शिपायाची हिंगोलीत गळफास घेऊन आत्महत्या

मुंबईतील पोलीस शिपायाची हिंगोलीत गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

कळमनुरी/बासंबा (जि. हिंगोली) : तालुक्यातील इसापूर रमना येथील रहिवासी व मुंबई पोलीस दलातील कार्यरत शिपाई केशव बाभनाजी वानखेडे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १३ फेबु्रवारी रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 

इसापूर रमणा येथील केशव वानखेडे हे मुंबई, वरळी पोलीस मुख्यालयात मागील १७ वर्षांपासून पोलीस शिपाई म्हणून कर्तव्य बजावत होते; परंतु काही कामानिमित्त ते त्यांच्या गावी हिंगोली तालुक्यातील इसापूर येथे रजेवर आले होते. १३ फेबु्रवारी रोजी परत ते कर्तव्यावर हजर होणार असल्याने त्यांनी वरळी येथे जाण्याची संपूर्ण तयारी केली. त्यानंतर ते शेतातून फेरफटका मारून येतो, असे नातेवाईकांना सांगून घराबाहेर पडले. बराच वेळ निघून गेला, परंतु ते घरी परतले नाहीत. त्यानंतर सकाळच्या सुमारास केशव वानखेडे यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत नातेवाईकांना आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (हिंगोली शहर) आर. आर. वैजणे, सपोनि आर. एच. मलपिलू, एएसआय मगन पवार, पोउपनि. भोसले, बीट जमादार राठोड आदींनी भेट देऊन पंचनामा केला. 

याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पार्थीवाववर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही, पोलीस तपासातच आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, हे निष्पन्न होईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Mumbai police constable commits suicide in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.