कायमस्वरूपी तहसीलदार मिळण्यासाठी मुंडन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:02 AM2021-09-14T04:02:26+5:302021-09-14T04:02:26+5:30
पाच महिन्यांपासून कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहे. यासह नगर परिषदेला मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागात वर्षभरापासून उपअभियंता, ...
पाच महिन्यांपासून कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहे. यासह नगर परिषदेला मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागात वर्षभरापासून उपअभियंता, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख आदी ठिकाणचा कारभार कनिष्ठ अधिकारी कार्यलायचे प्रभारी म्हणून पाहत आहेत. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार, लिपिकांच्या जागा रिक्त असल्यामुळे संजय गांधी निराधार योजननेचे कामे, रेशन कार्ड ऑनलाईन करणे, नुकसानीचे पंचनामे प्रलंबित आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ कायमस्वरूपी तहसीलदाराची नेमणूक करावी, यासह इतर पदे सुद्धा भरावीत, अशी मागणी शिरसाठ यांनी केली आहे. या वेळी अबेद सैय्यद, सुरेश दंडे, संदीप मैराळ, देविदास काळुंके, देवानंद मालकर, रुद्रा निचित, संजय राऊत, चेतन सोमवंशी, समीर शेख, सौरभ आमराव, सागर शेजवळ, अमोल आळंजकर आदी उपस्थित होते.