दूध डेअरीच्या जागेवर मुंडे यांच्या स्मारकाला विरोध कायम

By Admin | Published: November 14, 2015 12:43 AM2015-11-14T00:43:16+5:302015-11-14T00:53:55+5:30

औरंगाबाद : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबादेतील स्मारकास मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने पुन्हा एकदा विरोध दर्शविला आहे.

Munde's memorial stands in place of Milk Dairy | दूध डेअरीच्या जागेवर मुंडे यांच्या स्मारकाला विरोध कायम

दूध डेअरीच्या जागेवर मुंडे यांच्या स्मारकाला विरोध कायम

googlenewsNext


औरंगाबाद : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबादेतील स्मारकास मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने पुन्हा एकदा विरोध दर्शविला आहे. शासकीय जागेवर आणि शासनाच्या पैशांवर स्मारक उभारण्यात येऊ नये. खाजगी जागेवर आणि स्वत:च्या निधीतून भाजपने स्मारक उभारावे, अशी मागणी आ. इम्तियाज जलील यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.
राज्य शासनाने औरंगाबादेत महिला व लहान मुलांसाठी २०० खाटांचे हॉस्पिटल मंजूर केले आहे. या रुग्णालयासाठी तब्बल ४५ कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, मागील दोन वर्षांपासून औरंगाबादेत कुठेच जागा सापडत नव्हती. एकीकडे रुग्णालयासाठी शासनाला जागा सापडत नाही, दुसरीकडे जालना रोडवर शासकीय दूध डेअरीच्या जागेत स्मारक उभारण्याची तयारी शासनाने सुरू केली. अगोदर रुग्णालयाला जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सहा महिन्यांपूर्वी जलील यांनी केली होती.
शासनाने जालना रोडवर शासकीय दूध डेअरीच्या २४ एकर जागेपैकी ७ एकर जागेवर महिला व मुलांसाठी रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली. उर्वरित जागेवर गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाला आमचा काल पण विरोध होता आणि उद्याही राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
हैदराबाद मुक्तिसंग्रामला विरोध
सिद्धार्थ उद्यानात पालकमंत्री रामदास कदम यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम स्मारक उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुळात उद्यानाच्या जागेवर अशा प्रकारचे कोणतेही स्मारक नियमानुसार उभारता येत नाही.
या स्मारकालाही आमचा विरोध आहे. कारण शहरात चांगले रस्ते नाहीत. कचराकुंड्या नाहीत, स्मारकावर पाच ते सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शहराची गरज स्मारक नाही, तर मूलभूत सोयी-सुविधा आहेत.

Web Title: Munde's memorial stands in place of Milk Dairy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.