महापालिका प्रशासनाने केला तत्परतेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:04 AM2021-09-09T04:04:02+5:302021-09-09T04:04:02+5:30

जेसीबीच्या साह्याने बुढीलेन रस्त्यावरील गाळ काढला. कबाडीपुरा आरोग्य केंद्रात शिरलेले पावसाचे पाणी काढण्यात आले. खाम नदीपात्राच्या परिसरातील गरमपाणी, कोतवालपुरा ...

Municipal administration claims readiness | महापालिका प्रशासनाने केला तत्परतेचा दावा

महापालिका प्रशासनाने केला तत्परतेचा दावा

googlenewsNext

जेसीबीच्या साह्याने बुढीलेन रस्त्यावरील गाळ काढला. कबाडीपुरा आरोग्य केंद्रात शिरलेले पावसाचे पाणी काढण्यात आले. खाम नदीपात्राच्या परिसरातील गरमपाणी, कोतवालपुरा या वसाहतींतील नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना केली. चुनाभट्टी पुलावर साचलेली माती, कचरा साफ करण्यात आला. धोबीघाट, फाजलपुरा येथील पुलावरील, टिळकपथ येथील कचरा साफ करण्यात आला. बारूदगरनाला येथील गल्लीत साचलेला कचरा, मृत जनावरे जेसीबीने नेण्यात आली. औषधी भवन रोडवरील कचरा उचलून स्वच्छ करण्यात आला. किराडपुरा, औरंगाबाद टाइम्स कॉलनी या ठिकाणी नाल्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी २ जेसीबी तैनात करण्यात आले. स्वामी विवेकानंदनगर एन-१२ येथील जितेंद्र पाटील, शशिकांत पाटील यांच्या घरामध्ये ड्रेनेजचे पाणी शिरले होते. जेटिंग मशीनद्वारे चोकअप काढण्यात आले. सुदर्शननगर येथील दोन घरांच्या तळमजल्यात पाणी शिरले होते. मोटारीने पाणी उपसण्यात आले. हर्सूल भागात फुलेनगर येथे घरांमध्ये शिरलेले पाणी जेसीबीच्या साहाय्याने पाण्याला वाट मोकळी करून दिली. चेतनानगर भागात पोलीस कॉलनीमध्ये पाणी शिरले होते. ग्रीन व्हॅली, गीतानगर भागातील पाणी काढण्यात आले.

शिवनेरी कॉलनीत येथील पार्वती कन्या विद्यालयाशेजारील भिंत पडली होती. मलबा जेसीबीने उचलण्यात आला. आंबेडकरनगर येथील ग्रीव्हज् कंपनी ते जाधववाडी रस्त्यालगतच्या तीन घरांत शिरलेले पाणी काढण्यात आले. मिसरवाडी येथील सिकंदर कॉलनी, रोशननगर, श्रीकृष्णनगर, सुभेदार रामजीनगर येथील पाणी काढले.

चौधरी कॉलनी येथील सावता मंगल कार्यालय, आठवडी बाजारासमोरील पुलावर अडकलेल्या फांद्या, मलबा काढला. हिनानगर, गुलमोहर कॉलनी येथील राजीव गांधी मैदान, चिकलठाणा येथील मुल्ला गल्ली, राजनगर, मुकुंदनगर येथे साचलेले पाणी काढले. वीटखेडा येथील स्मशानभूमीची संरक्षक भिंत नाल्यात पडली. सातारा परिसरातील कुलकर्णी यांच्या मोकळ्या जागेवरील संरक्षक भिंत पडली. श्रेयनगर येथील शलाखा अपार्टमेंटजवळील पुलालगत पाइपमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोल, झाडे मलबा साचल्याने नाल्याच्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला होता. सुयोग कॉलनी, पानट हॉस्पिटल, गौतमनगर, रोकडिया हनुमान कॉलनी, स्नेहनगर, संकल्प अपार्टमेंट, विष्णूनगर येथील गटारी साफ करण्यात आल्या.

Web Title: Municipal administration claims readiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.