चार धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:32 PM2017-11-16T23:32:04+5:302017-11-16T23:32:10+5:30
महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी शहरातील चार अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी शहरातील चार अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली. संघर्षनगर मुकुंदवाडी भागात नागरिकांनी धार्मिक स्थळ हटविण्यास विरोध केल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढण्यात आले. हा अपवाद वगळता शांततेत धार्मिक स्थळे हटविली.
चार धार्मिक स्थळांवर निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला शासनाकडून उत्तर प्राप्त होताच बुधवारी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांचे पथक हनुमान मंदिर, भाजीमंडई, बुढीलेन येथे पोहोचले.