महापालिकेतर्फे २६ कन्टेनमेंट झोन जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:03 AM2021-04-05T04:03:27+5:302021-04-05T04:03:27+5:30

औरंगाबाद : महापालिका हद्दीत मागील दीड महिन्यापासून दररोज एक ते दीड हजार रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. ज्या भागातून सर्वाधिक ...

Municipal Corporation announces 26 containment zones | महापालिकेतर्फे २६ कन्टेनमेंट झोन जाहीर

महापालिकेतर्फे २६ कन्टेनमेंट झोन जाहीर

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिका हद्दीत मागील दीड महिन्यापासून दररोज एक ते दीड हजार रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. ज्या भागातून सर्वाधिक रुग्ण येत आहेत त्या भागाला महापालिकेने कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केले नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर सर्वत्र टीका सुरू करण्यात आली. प्रशासनाने तातडीने स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांकडून झोन निश्चितीचे काम करून घेतले. शनिवारी सायंकाळी शहरात एकूण २६ कन्टेनमेंट झोन असल्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये तीन वेगवेगळ्या श्रेणीत या झोनची विभागणी करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हपलमेंट कॉर्पोरेशन टीमकडून शहरातील कन्टेनमेंट झोन निश्‍चित करण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले. होती. स्मार्ट सिटीच्या टीमने शहरातील ३७ आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आशा वर्कर्सकडून सर्वेक्षण पूर्ण केले. मागील वीस दिवसांत केलेल्या या सर्वेक्षणात अभ्यासाअंती २६ वसाहती कन्टेनमेंट झोन अर्थातच हॉटस्पॉट म्हणून घोषित केल्या आहेत. तीन प्रकारात कन्टेनमेंट झोनचे वर्गीकरण करून ते जाहीर केले आहेत. पहिल्या प्रकारात पंधरापेक्षा जास्त आणि ५० पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत, अशा ६ वसाहती मायक्रो कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या आहेत. तर ज्या भागात ५० पेक्षा जास्त आणि १०० पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत, अशा १२ वसाहतींना मध्यम (मीडियम) कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. तर १०० पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ८ वसाहतींना लार्ज कन्टेनमेंट झोन (बिग हॉटस्पॉट) म्हणून रविवारी पालिकेने जाहीर केले.

मोठे हॉटस्पॉट असलेले ८ भाग

शिवाजीनगर : रामकृष्णनगर, काबरानगर, गारखेडा.

सिडको एन ९ : पवननगर, आंबेडकरनगर, शिवनेरी कॉलनी.

सिडको एन-६ : मोतीवालानगर, एमजीएम परिसर, किराडपुरा.

उल्कानगरी : बाैद्धनगर, उत्तमनगर, टिळकनगर, गारखेडा.

कांचनवाडी : वॉर्ड क्रमांक-१०७ विटखेडा परिसर.

ज्योतिनगर वॉर्ड : दशमेशनगर.

पुंडलिकनगर : गारखेडा परिसर, विद्यानगर.

एन-२ मुकुंदवाडी : सिडको एन-३, जयभवानीनगर.

१२ मध्यम कन्टेनमेंट झोन

देशमुखनगर, रेणुकानगर, बारावी योजना, झांबड इस्टेट

विश्‍वरूप हॉल एरिया, शास्त्रीनगर, बालाजीनगर, सिंधी कॉलनी, हनुमाननगर, ज्योतिनगर, ज्ञानेश्‍वर कॉलनी, एसटी कॉलनी-ठाकरेनगर.

६ मायक्रो कन्टेनमेंट झोन

नाथपुरम सोयायटी, आदित्य नगर, कासलीवाल विश्‍व, खिवंसरा पार्क, पुंडलिकनगर गल्ली-५, पुंडलिकनगर गल्ली - १०.

Web Title: Municipal Corporation announces 26 containment zones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.