महापालिकेला शिक्षक दिनाचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:05 AM2021-09-06T04:05:02+5:302021-09-06T04:05:02+5:30
औरंगाबाद : माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षक दिनाचा महापालिकेच्या शिक्षण विभागाला विसर पडला. शिक्षण ...
औरंगाबाद : माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षक दिनाचा महापालिकेच्या शिक्षण विभागाला विसर पडला. शिक्षण विभागाने एकाही कार्यक्रमाचे आयोजन केले नाही. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे औदार्यही दाखविले नाही.
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून यापूर्वी या दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. पाच आदर्श शिक्षकही निवडण्यात येत होते. महापालिकेच्या आस्थापनेवर ४१२ शिक्षक आहेत. तासिका तत्त्वावरील शिक्षकांची संख्या वेगळीच आहे. महापालिका मुख्यालयात दरवर्षी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येते. यंदा अभिवादनाचाही विसर मनपाला पडला. शिक्षण विभागाच्या या उदासीन धोरणावर अनेक शिक्षकांनी टीकाही केली.
एकही कार्यक्रम घेतला नाही
महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आपण यापूर्वी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतो. कोरोना संसर्गामुळे अलीकडे कार्यक्रम घेणे बंद झाले. आज शाळांमध्ये अभिवादन आणि काही कार्यक्रम झाले. मनपा मुख्यालयात सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन का केले नाही, हे मला माहीत नाही.
रामनाथ चौरे, प्रभारी शिक्षणाधिकारी, मनपा