शहर स्वच्छतेसाठी महापालिकेचा २० कलमी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 02:54 PM2020-10-03T14:54:57+5:302020-10-03T14:55:38+5:30
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात शहराची रॅंकींग सुधारली असून देशातील प्रमुख १० शहरांमध्ये शहराचा समावेश व्हावा, यासाठी प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वच्छतेवर भर देत २० कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात शहराची रॅंकींग सुधारली असून देशातील प्रमुख १० शहरांमध्ये शहराचा समावेश व्हावा, यासाठी प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वच्छतेवर भर देत २० कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये सर्वाधिक भर महापालिकेच्या एसटीपी प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वापर कसा होईल, त्यातून महापालिकेचे उत्पन्न कसे वाढेल यावर देण्यात येत आहे. सुरतच्या मॉडेलचा अभ्यास केला जात असून अनेक नागरिकांनी नाल्यात कचरा टाकणे थांबवावे यासाठी नाल्याच्या दर्शनी भागावर लोखंडी जाळी लावण्यात येणार आहे. तसेच ई- कचरा जमा करण्यासाठी विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाईल.
ज्या भागातून जास्त कचरा निघतो किंवा कचरा रस्त्यावर आणून टाकला जातो, तिथे फिक्स पाॅईंट तयार केले जातील. सुक्या कचऱ्यावर तात्काळ प्रक्रिया केली जाईल, यासाठी कांचनवाडी, रामनगर, मध्यवर्ती जकात नाका येथे छोटे प्रकल्प सुरू करण्यात येतील आणि नागरिकांचा या मोहिमेत सहभाग वाढावा यासाठी आय लव्ह औरंगाबाद हे अभियान सुरू करण्यात येईल, असेही महापालिका प्रशासकांनी सांगितले.