नगर पालिकेची ८१ लाखांची फसवणूक
By Admin | Published: March 19, 2017 11:32 PM2017-03-19T23:32:44+5:302017-03-19T23:35:14+5:30
तुळजापुर :पालिकेची ८१ लाख ८४ हजार ५४५ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर येथील पंधे इन्फोकॅन्स प्रा़ लि़ विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तुळजापुर : घरकूल बांधकामाचे काम हाती घेऊन ते अर्धवट सोडत तुळजापूर पालिकेची ८१ लाख ८४ हजार ५४५ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर येथील पंधे इन्फोकॅन्स प्रा़ लि़ विरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील घरकुलांचे काम ११ महिन्यात अटी व शर्तीनुसार पूर्ण करण्याचे काम सोलापूर येथील पंधे इन्फोकॉन्स प्रा. लि. कंपनीस देण्यात आले होते़ या कामासाठी पालिकेने अॅडव्हॉन्स रक्कम २ कोटी रूपये दिलेली होती़ असे असतानाही कंपनीने काम अर्धवट स्थितीत सोडून नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान केले़
त्यापैकी शासकीय रक्कम ८१ लाख ८४ हजार ५४५ रुपये स्वत:च्या फायद्याकरिता वापरले आणि नगरपरिषद एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधारणेच्या लौकिकास बाधा आणली़ तसेच रक्कम परत करतो असे खोटे आश्वासन देत बनावट चेक देवून नगरपरिषदेची फसवणूक केल्याची फिर्याद मुख्याधिकारी राजीव शंकर बुबणे यांनी तुळजापूर ठाण्यात दिली़ बुबणे यांच्या फिर्यादीवरून पंधे इन्फोकॉन्स प्रा. लि., सोलापूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.(वार्ताहर)