महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग झाला स्वतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:37 PM2017-08-17T23:37:08+5:302017-08-17T23:37:08+5:30

दोन वर्षापूर्वी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मालमत्ता विभागास जोडण्यात आला होता. या विभागाला स्वतंत्रपणे काम करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहे. पाणी पुरवठा विभागाचे ५५ वसुली लिपिक मालमत्ता विभागातून बाहेर काढण्यात आले आहेत.

Municipal corporation's water supply became independent | महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग झाला स्वतंत्र

महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग झाला स्वतंत्र

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दोन वर्षापूर्वी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मालमत्ता विभागास जोडण्यात आला होता. या विभागाला स्वतंत्रपणे काम करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहे. पाणी पुरवठा विभागाचे ५५ वसुली लिपिक मालमत्ता विभागातून बाहेर काढण्यात आले आहेत.
महापालिकेच्या मालमत्ता विभागास पाणीपुरवठा विभाग जोडण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी घेण्यात आला होता. मात्र या दोन वर्षात पाणी पुरवठा विभागाची वसुली पूर्णत: ठप्प झाल्याची बाब पुढे आली आहे. पाणी पुरवठा विभागाचे वसुली लिपीकही मालमत्ता कराचेच वसुली करत राहिले. शहरातील मालमत्ता धारकांनी आपल्याकडील थकीत कर भरताना मालमत्ता कराचाच भरणा केला. दुसरीकडे पाणी पुरवठ्याचा कर मात्र तसाच वाढत गेला आहे. ही बाब लक्षात आल्या नंतर मालमत्ता विभागाशी जोडलेले जवळपास ५५ कर्मचारी वेगळे करण्यात आले आहेत. हे कर्मचारी आता केवळ पाणी पुरवठा विभागाच्या वसुलीचे काम करणार आहेत. या कर्मचाºयावर पाणी पुरवठ्याचा थकीत कर वसुलीची मोठी जबाबदारी सोपवण्यात आले आहे. याच करवसुलीतून पाणी पुरवठा विभागातील कर्मचाºयांचे वेतन तसेच शहरातील जवळपास ८० पंपहाऊसचे वीजबील अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे वसुलीचे मोठे काम पाणी पुरवठा विभागाला लागणार आहे.

Web Title: Municipal corporation's water supply became independent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.