पाण्यासाठी नगरसेवकपती टाकीवर

By Admin | Published: May 23, 2016 11:37 PM2016-05-23T23:37:31+5:302016-05-23T23:48:10+5:30

लातूर : महापालिकेने नळाद्वारे पाणी द्यावे या मागणीसाठी काँग्रेसच्या नगरसेविका योजना कामेगावकर यांचे पती नागसेन कामेगावकर यांनी सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास

Municipal Councilor tank on water | पाण्यासाठी नगरसेवकपती टाकीवर

पाण्यासाठी नगरसेवकपती टाकीवर

googlenewsNext

धुंदीत आंदोलन : पोलीस अन् अग्निशमन दलाची धावपळ
लातूर : महापालिकेने नळाद्वारे पाणी द्यावे या मागणीसाठी काँग्रेसच्या नगरसेविका योजना कामेगावकर यांचे पती नागसेन कामेगावकर यांनी सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक बार्शी रोडवरील एमजेपीच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली़ दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी टाकीवर चढून कामेगावकर यांची समजूत घालत त्यांना खाली उतरविले़ मात्र, त्यांनी मद्यपान केल्याची शक्यता आल्याने पोलिसांनी त्यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठविले आहे़
लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई आहे़ टँकरद्वारे मनपाने पाणी वितरण सुरू केले आहे़ नळाने पाणी देणे शक्य नसल्याचे मनपा प्रशासनाने वारंवार सांगूनही आंदोलने करून लक्ष वेधले जात आहे़ सोमवारी सायंकाळी अचानक प्रभाग क्ऱ१७ च्या नगरसेविका योजना कामेगावकर यांचे पती नागरसेन कामेगावकर यांनी अचानक बार्शी रोडवरील टाकीवर धाव घेतली़ नळाला पाणी सोडलेच पाहिजे, असे म्हणत ते टाकीवर चढले़ यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली़ याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ तसेच अग्नीशमन दलाचेही एक वाहन येऊन थांबले़ यावेळी पोलिसांनी कामेगावकर यांची समजूत काढली़ पण ते वेगळ्याच धुंदीत असल्याने बराचवेळ त्यांनी दाद दिली नाही़ दरम्यान, मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संवाद साधला़ तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या आपण खाली बसून चर्चा करू, असे सांगितल्यावर ते खाली आले़
वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात़़़
दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी नागसेन कामेगावकर यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठविले आहे़ कामेगावकर यांनी मद्यप्राशन केल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे़ घटनास्थळी एमआयडीसीचे सपोनि़ सुधाकर बावकर, मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी भेट देऊन चर्चा केली़ मनपात काँग्रेसची सत्ता असताना सत्ताधारी नगरसेवकाच्या पतीला आंदोलन करण्याची वेळ आल्याची चर्चा रंगली आहे़ दरम्यान, कामेगावकर यांना हे आंदोलन चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे़

Web Title: Municipal Councilor tank on water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.