महापालिकेने वाढविली कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:05 AM2021-07-27T04:05:01+5:302021-07-27T04:05:01+5:30
औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टअखेर येईल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने आतापासूनच तपासण्यांची संख्या वाढविली आहे. ...
औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टअखेर येईल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने आतापासूनच तपासण्यांची संख्या वाढविली आहे. शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष देण्यात येत असून, सोमवारी दिवसभरात विविध केंद्रांवर तब्बल ९१४ जणांची टेस्ट करण्यात आली. मात्र, कोणीही बाधित आढळून आले नाही. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३४ टक्क्यांवर आला आहे. दररोज १० ते १४ बाधित रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेचे, खासगी रुग्णालयांमधील कोविड कक्ष रिकामे झाले आहेत. सोमवारी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहराच्या ६ एन्ट्री पॉइंटवर ७६३ जणांची ॲंटिजन टेस्ट करण्यात आली. ९ शासकीय कार्यालयांमध्ये १५१ जणांची टेस्ट केली. पण एकही बाधित आढळून आला नाही. रविवारी रेल्वेस्टेशन व विमानतळावर ८० प्रवाशांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. त्यातून एकही प्रवासी पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.
----------------
एन्ट्री पॉइंटवरील टेस्ट
केंद्र- तपासणी संख्या
चिकलठाणा-११६
हर्सूल टी पॉइंट- १०९
कांचनवाडी- २५४
झाल्टा फाटा-१४४
नगर नाका- ७३
दौलताबाद टी पॉइंट- ६७
-----------
शासकीय कार्यालये
महापालिका मुख्यालय-०९
पोलीस आयुक्त कार्यालय-३५
उच्च न्यायालय-१५
जिल्हाधिकारी कार्यालय-२७
विभागीय आयुक्त कार्यालय-०२
आरटीओ कार्यालय-२०
जिल्हा न्यायालय-१३
कामगार उपआयुक्त कार्यालय- १०
कामगार कल्याण कार्यालय-२०
-----
रेल्वेस्टेशन-५०
विमानतळ-३०
-------------