४८ रेमडेसिविरच्या अपहाराला अटकेतील मनपा अधिकाऱ्यांचे परस्परांकडे बोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:07 AM2021-05-05T04:07:01+5:302021-05-05T04:07:01+5:30
औरंगाबाद : भवानीनगर येथील महापालिकेच्या औषधी भांडारात झालेल्या ४८ रेमडेसिविर इंजेक्शनच्या अपहारप्रकरणी अटकेतील मनपाचे दोन ...
औरंगाबाद : भवानीनगर येथील महापालिकेच्या औषधी भांडारात झालेल्या ४८ रेमडेसिविर इंजेक्शनच्या अपहारप्रकरणी अटकेतील मनपाचे दोन अधिकारी परस्परांकडे बोट दाखवित असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मंगळवारी न्यायालयाने दोन्ही आरोपींना ७ दिवस पोलीस कोठडी सुनावली.
मुख्य औषध निर्माण अधिकारी विष्णू दगडू रगडे (रा. मारुतीनगर, मयूर पार्क) आणि कंत्राटी औषध निर्माण अधिकारी प्रणाली शेषराव कोल्हे (रा. मयूर पार्क) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रगडे आणि त्यांची सहायक म्हणून कोल्हे कार्यरत आहेत.
सोमवारी अटक झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी दोघांची चौकशी केली असता, दोघेही परस्परांकडे बोट दाखवित असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. औषधी भांडाराच्या किल्ल्या दोन्ही आरोपींकडे होत्या. यामुळे त्यांच्यापैकी कुणी तरी अथवा दोघांनी संगनमताने इंजेक्शन्सचा अपहार केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.