पालिका आरक्षण सोडतीत झाला घोळ
By Admin | Published: July 8, 2016 12:08 AM2016-07-08T00:08:20+5:302016-07-08T00:41:28+5:30
बीड : माजलगाव येथील नगर पालिकेतील नगर सेवकांचे आरक्षरण सोडत २ जुलै रोजी काढण्यात आली होती. सोडती दरम्यान एकाच प्रवर्गातील एकाच व्यक्तीच्या दोन चिठ्ठया गेल्या होत्या.
बीड : माजलगाव येथील नगर पालिकेतील नगर सेवकांचे आरक्षरण सोडत २ जुलै रोजी काढण्यात आली होती. सोडती दरम्यान एकाच प्रवर्गातील एकाच व्यक्तीच्या दोन चिठ्ठया गेल्या होत्या. हा प्रकार समोर आल्यानंतर माजलगाव पालिकेची आरक्षण सोडत रद्द करून नव्याने सोडत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरूवारी दिले आहेत. शुक्रवारी पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
माजलगाव नगर पालिकेत एकूण १२ प्रभाग आहेत. येथील आरक्षण काढता वेळी संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून एकाच नावाची व प्रवर्गाची डब्बल चिठ्ठी बनविण्यात आली होती.
हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर यावर प्रशासनाने माजलगाव न. प. चे मुख्याधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली. यावरून जिल्हाधिकारी नव्याने आरक्षण सोडतीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. (वार्ताहर)
माजलगाव चे उप विभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली २ जुलै रोजी आरक्षण सोडत करण्यात आली होती. मात्र गांभीर्यांने आरक्षण प्रक्रीया न केल्याने अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या. आता बीड येथून उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव व त्यांची टिम आरक्षण सोडतीसाठी शुक्रवारी माजलगावकडे रवाना होणार आहे.
आरक्षण सोडत प्रक्रीयेत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नजर चुकीने जादा चिठ्या गेल्याचा प्रकार झाला होता. या प्रकरणात शुक्रवारी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येईल.
-नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, बीड