मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे मन जिंकले; सादरीकरणाचे केले कौतुक
By संतोष हिरेमठ | Published: February 27, 2023 12:52 PM2023-02-27T12:52:37+5:302023-02-27T12:53:22+5:30
मुकुंदवाडी येथील मनपा शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोल-ताशांच्या सादरीकरण केले
छत्रपती संभाजीनगर : जी-२० राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत होत असलेल्या वूमन- २० या परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी सोमवारी सकाळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्या. यावेळी मुकुंदवाडी येथील मनपा शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोल-ताशांच्या सादरीकरण त्यांचे मन जिंकले. विद्यार्थिनींना जवळ बोलावून स्मृती इराणी यांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जिल्हाधिकारी आस्तिकुमार पांडेय, विमानतळ संचालक डी.जी. साळवे, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, तहसीलदार ज्योती पवार , विमानतळाच्या रेखा पवार आदींची विमानतळावर उपस्थिती होती. शिक्षिका अंजली चिंचोलीकर यांची उपस्थिती होती.