महानगरपालिका पुन्हा खडखडाटाच्या दिशेने !
By Admin | Published: September 11, 2014 12:43 AM2014-09-11T00:43:10+5:302014-09-11T01:09:37+5:30
औरंगाबाद : महापालिकेची मागील १९ महिन्यांत बसलेली आर्थिक घडी आता पुन्हा विसकटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
औरंगाबाद : महापालिकेची मागील १९ महिन्यांत बसलेली आर्थिक घडी आता पुन्हा विसकटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उत्पन्नाचा झरा आटला असून, खर्चाच्या मोठ्या वाटा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेची तिजोरी पुन्हा खडखडाटाच्या दिशेने चालल्याचे दिसते आहे.
आयुक्त पी.एम. महाजन व त्यांच्या टीमसमोर आर्थिक घडी बसविण्यासाठी उत्पन्न वाढविण्याचे मोठे आव्हान आहे.
पालिकेला दरमहा प्रशासकीय खर्च, देणी व विकासकामांसाठी ५० कोटींची आवश्यकता आहे, तर २६ कोटींच्या आसपास उत्पन्न मिळते
आहे.
सप्टेंबर महिन्यात तरी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात प्रशासनाला जास्त अडचणी आल्या नाहीत. मात्र, पुढच्या महिन्यापासून वेतन अदा करण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार
आहे.
विकासकामांची देणी अदा करणेदेखील पालिकेला जड जाणार आहे. त्यामुळे येत्या आठ महिन्यांत विकासकामे करून घेण्यासाठी नगरसेवक आणि प्रशासन अशी रस्सीखेच होणार आहे.