नगराध्यक्षांनी पोसले गुत्तेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:04 AM2017-11-16T00:04:42+5:302017-11-16T00:06:19+5:30

शासनाच्या विविध योजनांसाठी आपणच प्रयत्न केले. आपल्यामुळेच योजना कार्यान्वित झाली, असे म्हणून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. वास्तविक पाहता हे नगराध्यक्ष विविध कामांत अव्वाच्च सव्वा बिले लावून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम करीत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष तथा नगराध्यक्षांचे पुतणे हेमंत क्षीरसागर यांनी केला.

municipality feed contractors | नगराध्यक्षांनी पोसले गुत्तेदार

नगराध्यक्षांनी पोसले गुत्तेदार

googlenewsNext
ठळक मुद्देपत्रपरिषदेत काकांवर आरोपशासनाच्या योजनांचे श्रेय घेतले - हेमंत क्षीरसागर

बीड : शासनाच्या विविध योजनांसाठी आपणच प्रयत्न केले. आपल्यामुळेच योजना कार्यान्वित झाली, असे म्हणून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. वास्तविक पाहता हे नगराध्यक्ष विविध कामांत अव्वाच्च सव्वा बिले लावून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम करीत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष तथा नगराध्यक्षांचे पुतणे हेमंत क्षीरसागर यांनी केला.


बीड नगर पालिकेत बुधवारी सायंकाळी काकु-नाना आघाडीचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, पाणीपुरवठा सभापती फारूक पटेल, बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांवर सडेतोड टिका करण्याबरोबच विविध योजना व रखडलेल्या टेंडरची माहिती दिली.


हेमंत क्षीरसागर म्हणाले, बीड शहरात सध्या आपण विविध योजना आणण्यसाठी प्रयत्न केले. आपल्यामुळेच उद्यान, स्वच्छता, पाणी पुरवठा, भुयारी गटार कार्यान्वीत होत आहेत. वास्तविक पाहता या सर्व योजना केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत झालेल्या आहेत. यासाठी सर्वांनीच परिश्रम घेतलेले आहेत. परंतु नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर आपणच हे सर्व केले असे म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. हे श्रेय घेण्याचे त्यांनी सोडून द्यावे. हे करण्यापेक्षा विकास कामांत लक्ष घातले तर शहर हरीत होईल, असे म्हणून हेमंत क्षीरसागर यांनी काकाला टोला लगावला. स्वच्छतेचे टेंडर पास करण्यासाठी नगराध्यक्षांनी रोगराई पसरण्याची वाट पाहिली, असा आरोपही हेमंत क्षीरसागर यांनी यावेळी केला.


पाणी पुरवठा सभापती फारूक पटेल म्हणाले, हरीत शहर करण्यासाठी लावलेले झाडे नियमात नव्हती. त्यांची उंची कमी होती. तसेच ते जगविलेही नाहीत. परंतु गुत्तेदार पोसण्यासाठी २२०० रूपये बील यासाठी अदा करण्यात आला. हे काम केवळ नगराध्यक्ष गुत्तेदार पोसण्यासाठी करीत आहेत. पाणी पुरवठा विभागाच्या योजनाही शासनाच्या आहेत. यामध्ये नगराध्यक्षांनी श्रेऊ नये. स्वता:ची पाठ थोपटून घेण्याचे काम बंद करावे, असा सुचक सल्लाही पटेल यांनी केला. तसेच दरडोई १३५ लिटर पाणी देणे बंधनकारक असून त्यासाठी आघाडी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. नगराध्यक्षांनी विकास कामाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करु नये असे ते म्हणाले.

अमर नाईकवाडे झाले आक्रमक
बीड पालिकेतील सर्व कारभार नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर हे धाब्यावर बसून करीत आहेत. जिल्हा रूग्णालयाजवळील रस्त्याचे काम आमदार फंडातून होत असल्याचा गाजावाजा त्यांनी केला. परंतु हे आमदार फंडातून नव्हे तर दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत करण्यात आलेले आहे. त्याचा पुरावाही नाईकवाडे यांनी यावेळी सादर केला. शहरातील शासकीय योजनांमधून झालेली कामे, विकास याबाबत नाईकवाडे यांनी पुरावे सादर केले. पुढे ते म्हणाले, विशेष सभेबाबत वारंवार पत्र दिले, परंतु आठवडा उलटूनही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. असेच प्रकार वारंवार होत आहेत. आम्ही श्रेयासाठी नव्हे तर विकासासाठी लढत आहोत, असा खुलासाही अमर नाईकवाडे यांनी केला.

Web Title: municipality feed contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.